श्रावणात पुजेसाठी तांब्याची भांडी न घासताही लख्ख चमकतील, पाहा ३ उपाय- एकूणएक भांडं होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 14:24 IST2025-07-11T12:47:15+5:302025-07-11T14:24:16+5:30

श्रावण आला की त्यापाठोपाठ व्रतवैकल्ये, उपवास सुरू होतात. यानिमित्ताने मग वेगवेगळ्या पूजाही केल्या जातात.(simple trick to clean brass and copper utensils)

आता घरात पूजा असेल तर त्यासाठी तांब्याची, पितळेची अशी खास भांडी वापरली जातात. ही भांडी नेहमी वापरात नसल्याने ती काळी पडतात. त्यांच्यावर डाग दिसू लागतात.(how to clean brass and copper utensils instantly?)

त्यामुळे कोणतीही पूजा, मंगल कार्य असेल तर सगळ्यात आधी या भांड्यांची स्वच्छता करावी लागते. ती भांडी लख्खं होऊन छान चमकली की मग आपल्यालाही आनंद होतो. पण त्यासाठी मेहनत मात्र बरीच करावी लागते.

ही मेहनत आता अजिबात करावी लागणार नाही. त्यासाठीच हा एक खास उपाय पाहा. घरच्याघरी एक जादुई पाणी तयार करा आणि त्यात तुमच्या घरातली जुनी, काळवंडलेली तांब्याची भांडी ४ ते ५ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. भांडं आपोआप स्वच्छ होऊन चमकेल.

हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये १ कप व्हाईट व्हिनेगर घ्या.

त्यामध्ये ७ ते ८ चमचे मीठ घाला. मीठ व्हिनेगरमध्ये पुर्णपणे विरघळून जाईपर्यंत ते हलवत राहा.

यानंतर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घाला. आता तुमच्याकडचं काळं पडलेलं तांब्याचं किंवा पितळेचं भांडं या पाण्यात बुडवून ठेवा. २ ते ३ मिनिटांतच ते भांडं अगदी नव्यासारखं स्वच्छ, चकाचक झालेलं दिसेल. तुम्हाला तासनतास भांडी घासत बसण्याची अजिबातच गरज पडणार नाही. करून पाहा.