चांदीच्या मंगळसुत्राच्या ८ आकर्षक डिझाईन्स; गळ्यात घाला नाजूक, सुंदर दागिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:18 IST2025-12-05T15:53:15+5:302025-12-05T16:18:22+5:30
Silver Mangalsutra For Daily Wear : चांदीच्या मंगळसूत्रात देखील काळे मणी वापरले जातात. हे काळे मणी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जातात.

चांदिची मंगळसूत्र सध्या ट्रेंडींग आहेत. पारंपारिक मंगळसूत्र सामान्यतः सोन्याचे असते, परंतु सिल्व्हर मंगळसूत्र ९२.५% शुद्ध चांदी वापरून बनवले जाते. (Silver Mangalsutra For Daily Wear)

आजकाल अनेक महिला सोन्याऐवजी चांदीचे मंगळसूत्र पसंत करतात. कारण ते हलके, स्टायलिश असते आणि दैनंदिन वापरासाठी आरामदायक असते. (Designs Of Silver Mangalsutra Patterns)

चांदीच्या मंगळसूत्रात देखील काळे मणी वापरले जातात. हे काळे मणी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जातात.

चांदीच्या मंगळसूत्राची डिझाईन्स सोन्याप्रमाणेच उपलब्ध असतात, जसे की पेंडेंट शैली, लॉकेट किंवा केवळ मण्यांची साखळी. यात गुलाबी सोने किंवा सोन्याचा मुलामा केलेले डिझाईन्सही मिळतात.

चांदी सोन्यापेक्षा खूपच स्वस्त असल्यामुळे, हे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसते आणि त्याची काळजी घेणे देखील सोपे आहे.

चांदीचे मंगळसूत्र त्वचेसाठी सुरक्षित असते आणि त्याला जास्त चमक देण्यासाठी त्यावर अनेकदा रोडियम पॉलिश केले जाते.

फॅशन आणि बजेटमुळे, अनेक तरुण महिला रोजच्या वापरासाठी चांदीचे किंवा सोन्याचा मुलामा दिलेले सिल्व्हर मंगळसूत्र निवडतात आणि खास प्रसंगी सोन्याचे मंगळसूत्र वापरतात.

सिल्व्हर मंगळसूत्र हे पारंपारिक सोन्याच्या मंगळसूत्राला एक आधुनिक आणि किफायतशीर पर्याय म्हणून महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

















