Rakshabandhan Gift Ideas: चांदीच्या नाजूक मंगळसुत्रांचे ७ डिझाइन्स, खिशाला परवडेल आणि बहिणीलाही आवडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 17:04 IST2025-08-05T16:56:03+5:302025-08-05T17:04:59+5:30
Rakshabandhan Gift Ideas for Sister, Brother,

राखीपौर्णिमच्या दिवशी बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न बऱ्याच भावांना पडतो. जर तुमची बहिण विवाहित असेल तर तिला रोजच्या वापरासाठी चांदीचं मंगळसूत्र देण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये असे कित्येक नाजूक प्रकार उपलब्ध आहेत.
अगदी १ ते दिड हजार रुपयांमध्ये तुम्हाला असे कित्येक सुंदर पॅटर्न मिळू शकतात.
बहुतांश महिलांना वेगवेगळे मंगळसूत्र घालण्याची आवड असतेच. त्यामुळे हा दागिना तुम्ही गिफ्ट म्हणून देणार असाल तर तो हमखास वापरला जातोच..
असे आकर्षक गिफ्ट पाहून तुमची बहिण तुमच्यावर नक्कीच खुश होऊन जाईल..
राखी पौर्णिमेच्या दिवशी लाडक्या भावाकडून बहिणीला अशी सौभाग्याची खूण गिफ्ट म्हणून मिळाली तर नक्कीच बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद पसरेल..
बहिण मॉडर्न असो किंवा पारंपरिक विचारांची असो.. तिला कधी ना कधी असं सुंदर मंगळसूत्र घालायला नक्कीच आवडेल..
सध्या सोन्याच्या किमती एवढ्या जास्त वाढलेल्या आहेत की त्यामुळे कित्येक जणी रोजच्या वापरासाठी सोन्याऐवजी चांदीचे नाजुक मंगळसूत्र घालण्यास प्राधान्य देत आहेत.