'मुलांवर संस्कार करण्याआधी स्वत:.....,' आर. माधवनचा पालकांसाठी डोळे उघडवणारा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 01:01 IST2026-03-31T00:45:27+5:302026-03-31T01:01:25+5:30
R Madhavan Shares A Parenting Advice : मुलांशी संवाद इतका मोकळा असावा की त्यांना कोणतीही गोष्ट सांगताना भिती वाटू नये. पालक असण्यापेक्षा मार्गदर्शक असण्यावर त्याचा विश्वास आहे.

आर माधवन हा बॉलिवूडमधील एक अत्यंत सुजाण आणि अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं मुलांच्या संगोपनाबाबत मांडलेले विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (R Madhavan Shares A Parenting Advice)

क्वालिटी टाईम ही पाश्चात संकल्पना
माधवनच्या मते मुलांसोबत फक्त ठराविक वेळ क्लालिटी टाईम म्हणून घालवणं ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीत आपण मुलांसोबत सहज राहतो. (R Madhavans Different Approach To Quality Time)

सहवासाचे महत्व
दिवसातील काही तास वेगळे काढून मुलांशी बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत राहणे आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनवणं महत्वाचे आहे.

मुलांवर संस्कारांचा मारा नको
मुलांना सतत उपदेश करण्यापेक्षा पालक स्वत:कसे वागतात याकडे मुलं जास्त लक्ष देतात. त्यामुळे स्वत:चे वागणे आदर्श ठेवण्यावर त्यानं भर दिला आहे.

मुलांना निर्णय घेऊ द्या.
माधवनचा मुलगा वेदांत हा एक यशस्वी जलतरणपटू आाहे. माधवने त्याला अभिनयात येण्यासाठी कधीच सक्ती केली नाही. तर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

मोकळेपणा
मुलांशी संवाद इतका मोकळा असावी की त्यांना कोणतीही गोष्ट सांगताना भिती वाटू नये. पालक असण्यापेक्षा मार्गदर्शक असण्यावर त्याचा विश्वास आहे.

शिस्त आणि स्वातंत्र्य
शिस्त महत्वाची आहे. पण ती लादलेली नसावी. मुलाला स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचे स्वातंत्र्या द्यायला हवे.

















