Navratri 2025 Fashion : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावर! पाहा ५ सुंदर ट्रेंडी बिंदी डिझाईन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 19:18 IST2025-09-23T16:32:50+5:302025-09-23T19:18:17+5:30
latest bindi styles for Garba night: Navratri special makeup tips: Garba look ideas 2025: या नवरात्रीत ट्राय करा नवीन बिंदी डिझाईन्स, जो तुमच्या गरबा लूकला देईल स्टायलिश आणि ट्रेंडी टच.

नवरात्री म्हणजे रंग, गरबा आणि आनंदाचा उत्सव. या दिवसांत प्रत्येकाला आपला लूक परफेक्ट करण्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करते. कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत सगळं ठरवताना आपल्या माथ्यावरील बिंदीकडे लक्ष देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. (latest bindi styles for Garba night)
बिंदी ही फक्त कपाळावरची छोटासा डॉट नाही, तर तुमच्या संपूर्ण लूकला ग्रेसफुल टच देणारा महत्त्वाचा भाग आहे. या नवरात्रीत ट्राय करा नवीन बिंदी डिझाईन्स, जो तुमच्या गरबा लूकला देईल स्टायलिश आणि ट्रेंडी टच.(Navratri special makeup tips)
'राम-लीला' चित्रपटानंतर ओमच्या आकाराच्या बिंदींना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आपण गरबा खेळायला जाणार असून तर या पद्धतीची बिंदी कपाळावर लावू शकतो.
आपण कपाळावर अनेक रंगबेरंगी टिकल्या एकावर एक लावू शकतो. त्याच्याखाली काळ्या रंगाचा अर्धा चंद्र काढून कपाळाची शोभा वाढवू शकतो.
जर तुमच्याकडे वेळ कमी असेल पण तरीही गरबा रात्री सुंदर दिसायचे असेल, तर एक साधी बिंदी डिझाइन तुमचा लूक पूर्ण करू शकते. यासाठी आपल्याला कपाळावर गोल छोटी बिंदी लावावी लागेल.
आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार बिंदी काढू शकतो. आपला चेहरा पातळ किंवा गोल असेल तर कपाळावर थोडीशी लांब आणि वक्र डिझाइन असलेली बिंदी लावण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडेल.
गोल बिंदी नेहमीच सुंदर दिसते. पण त्यात वेगळा ट्विस्ट जोडण्यासाठी, आपल्याला त्याच्याभोवती लहान डिझाइन्स तयार कराव्या लागतील. हा मिनिमलिस्ट पण एलिगंट लूक तुम्हाला वेगळे बनवेल.