'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचे खास साडी कलेक्शन; ८ मनमोहक लुक्स, साध्या साडीतही दिसते मॉडर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:27 IST2025-11-14T13:51:24+5:302025-11-14T18:27:38+5:30
Girija Oak's special saree collection : पारंपारीक साड्यांसोबतच ती शिफॉन, ऑर्गेन्झा आणि लिनन सारख्या फॅब्रिकच्या साड्या देखील सहजतेनं कॅरी करते,

गिरीजा ओक ही लोकप्रिय मराठी (Marathi Celebrity) आणि हिंदी चित्रपट तसंच मालिकांमधील अभिनेत्री आहे. सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून तिचे साडीतले फोटोज व्हायरल होत आहेत. (Girija Oak Simple Saree Designs)

तिच्या साड्यांच्या अप्रतिम निवडीसाठी आणि त्या स्टायलिश पद्धतीनं परीधान करण्याच्या कौशल्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

तिला पारंपारीक भारतीय विणकाम असलेल्या साड्या नेसायला आवडतात. यात पैठणी, नऊवारी, कांजीवरम, बनारसी, प्युअर कॉटन या साड्यांचा समावेश आहे.

पारंपारीक साड्यांसोबतच ती शिफॉन, ऑर्गेन्झा आणि लिनन सारख्या फॅब्रिकच्या साड्या देखील सहजतेनं कॅरी करते.

तिच्या कलेक्शनमध्ये गडद रंगाचे आणि पेस्टल शेड्सचे सुंदर मिश्रण दिसते.

साडीला एक वेगळा लूक मिळण्यासाठी ती विविध प्रकारचे स्टायलिश ब्लाऊज शिवते.

साडीवर पारंपारीक दागिने किंवा मिनिमल ज्वेलरीचा वापर करून ती तिचा लूक अधिक खुलवते.

तिचे साडी लूक्स फोटोग्राफीच्या दृष्टीनं खूपच आकर्षक असतात.

















