Margashirsha Guruvar 2025 : साबुदाणा खिचडी चिकट होते? १० टिप्स, करा परफेक्ट मोकळी- चवदार खिचडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:36 IST2025-11-25T11:39:46+5:302025-11-25T15:36:48+5:30
Margashirsha Guruvar 2025 : थंड तेलात साबुदाणा घातल्यास तो कढईला चिकटतो आणि साबुदाणा चिकटत नाही.

मार्गशीर्ष गुरूवारच्या (Margshish Guruvar) उपवासाला बरेचजण साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाणा खिचडी परफेक्ट, मऊ-मोकळी शिजावी यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Perfect Sabudana Khichdi)

साबुदाणा भिजवताना पूर्णपणे बुडेल आणि त्यावर फक्त अर्धा इंच पाणी राहील इतकंच पाणी घाला. जास्त पाणी घातल्यास खिचडी चिकट होते.

साबुदाणा भिजल्यानंतर अतिरिक्त पाणी काढून टाका आणि १५ ते २० मिनिटं ठेवा जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल. शेंगदाण्याचे कूट जाडसर असावे. ते अगदी बारीक पावडरसारखं करू नका. जाडसर कुट खिचडी मोकळी ठेवण्यास मदत करते.

साबुदाणा खिचडी करण्यापूर्वी भिजवलेला साबुदाणा आणि जाडसर शेंगदाण्याचे कूट, तिखट आणि मीठ एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करून घ्या. यामुळे साबुदाण्यावर शेंगदाण्याचे एक आवरण तयार होते आणि साबुदाणा चिकटत नाही.

खिचडी करताना कढईत तेल किंवा तूप चांगले गरम करा. थंड तेलात साबुदाणा घातल्यास तो कढईला चिकटतो आणि साबुदाणा चिकटत नाही.

खिचडी करताना तेल किंवा तूप चांगलं गरम करा. थंड तेलात साबुदाणा घातल्यास तो कढईला चिकटतो आणि गचका होतो.

उकडलेला बटाटा वापरत असाल तर तो जास्त मऊ नसावा. तो लहान तुकड्यांमध्ये चिरून घ्या तो आधी तुपात थोडा परतून घ्या. यामुळे तो जास्त स्टार्च सोडत नाही

कढईत साबुदाणा घातल्यावर तो हलक्या हातानं आणि सतत हलवत मध्यम आचेवर परतवून घ्या.

साबुदाणा खिचडीवर झाकणं ठेवणं टाळावं. झाकण ठेवल्यास आत वाफ तयार होते आणि साबुदाणा मऊ होऊन चिकट होण्याची शक्यता असते. खूपच गरज वाटली तर फक्त २ मिनिटांसाठीच झाकण ठेवा.

साबुदाणा खिचडी परतून झाली की नाही हे तपासण्यासाठी दाणा पारदर्शक होईपर्यंत परतवून ध्या. एकदा सर्व साबुदाणे पारदर्शक झाले की लगेच गॅस बंद करा. जास्त वेळ शिजवल्यास खिचडी कडक होते.

















