...म्हणून सुटतं महिलांचं पाेट! ‘या’ हार्मोनच्या गडबडीने तुम्ही होताय जाड, पोटाचा नगारा! पाहा उपाय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 15:50 IST2025-04-12T15:32:33+5:302025-04-12T15:50:02+5:30
Low Estrogen & Other Hormone Imbalances Can Cause Of Belly Fat In Women : Belly fat in women : The Connection Between Hormone Imbalances & Belly Fat : महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पोटाची ढेरी वाढते, ते हार्मोन्स कोणते ?

पोटाजवळ साचलेल्या चरबीच्या (Belly fat in women) थरांमुळे पोटाची वाढलेली ढेरी (Low Estrogen & Other Hormone Imbalances Can Cause Of Belly Fat In Women) दिसते. या वाढलेल्या पोटामुळे आपले एकूणच व्यक्तिमत्व आणि लूक खराब दिसतो. विशेषतः महिलांमध्ये पोटाजवळ चरबीचे थर साचण्याची समस्या सतावते.
वाढत्या वयानुसार, महिलांच्या पोटाभोवतीची चरबी (The Connection Between Hormone Imbalances & Belly Fat) वाढू लागते. यामागील मुख्य कारण हार्मोनल असंतुलन असू शकते. कोणत्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये पोटाची चरबी वाढते ते जाणून घेऊया.
इस्ट्रोजेन हा एक असा हार्मोन्स आहे, जो आपल्या शरीरातील फॅट्सची योग्य प्रमाणात विभागणी करण्यास मदत करतो. जेव्हा शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता असते तेव्हा पोटाची चरबी वेगाने वाढू लागते. महिलांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान, इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे महिलांच्या पोटाभोवतीची चरबी वेगाने वाढू लागते.
आपल्या शरीरातील इन्सुलिन हा देखील एक महत्वाचा हार्मोन्स आहे. इन्सुलिन आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. जेव्हा शरीरात इन्सुलिन प्रतिरोध वाढतो तेव्हा चरबी वेगाने वाढते.
जेव्हा आपण खूप जास्त ताण, स्ट्रेस घेतो तेव्हा आपल्या शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन मोठ्या प्रमाणांत तयार केले जाते. आपल्या शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वारंवार वाढत गेली तर आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण देखील खूप जास्त वाढते. त्यामुळे चरबी ओटीपोटाजवळील भागात साचून राहू शकते.
पोटाच्या भागातील बेली फॅट्स कमी करण्यासाठी, आहारातून साखर आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. जर तुम्ही रोजच्या डाएटमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेटसयुक्त पदार्थ अधिक जास्त खात असाल तर तुमचे डाएट बदलणे गरजेचे आहे.
तेलकट - तुपकट पदार्थ आणि जंकफूड खाल्ल्यानेही पोटाची चरबी झपाट्याने वाढते. पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी, शक्य तितके कमी तेलकट पदार्थ खावेत.