स्वंयपाक करताना गडबड झाली? १० टिप्स, वेळ वाचेल-झटपट होईल किचनचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:27 IST2026-03-06T15:36:52+5:302026-03-06T18:27:01+5:30

Kitchen Hacks : साखरेच्या डब्यात मुंग्या होत असतील तर या डब्यात ३ ते ४ लवंग घालून ठेवा. या वासामुळे मुंग्या येत नाहीत.

स्वंयपाकात कधी मिठाचा हात सुटतो तर कधी भाजी जास्त तिखट होते. अशावेळी गोंधळून न जाता हे झटपट किचन हॅक्स वापरून तुम्ही तुमचा पदार्थ वाचवू शकता. (Kitchen Hacks)

भाजी किंवा आमटीत मीठ जास्त झालं तर त्यात बटाट्याचे काप करून किंवा कणकेचे छोटे गोळे करून घाला. ते जास्तीचे मीठ शोषून घेतात.

भाजी तिखट झाली तर त्यात थोडं साजूक तूप, साय किंवा फ्रेश क्रिम एकजीव करा. भाजीत सार असेल तर कोमट दूध घातल्यानंही तिखटपणा कमी होतो.

आमटी खूपच पातळ झाली असेल तर थोडं दाण्याचं कूट किंवा फुटाण्याचे पीठ भाजून त्यात मिसळा. यामुळे भाजीला छान दाटपणा येतो.

भाताच्या भांड्यावर एक ब्रेडचा स्लाईस ठेवा आणि वर झाकण लावा. ब्रेड जास्तीचा ओलावा शोषून घेईल.

भाजी करपली असेल तर करपलेला वास घालवण्यासाठी भाजी लगेच दुसर्‍या भांड्यात काढून घ्या आणि त्यात २ चमचे दही किंवा दूध घालून मंद आचेवर थोडावेळ शिजवा.

रस काढण्यापूर्वी लिंबू साधारण १ मिनिटभर कोमट पाण्यात ठेवून द्या. यामुळे भरपूर रस निघतो.

तळलेले वडे किंवा भजी टिश्यू पेपरवर ठेवून किंवा काही काळ प्री हिटेड ओव्हनमध्ये ठेवा. ज्यामुळे जास्तीचे तेल निघून जाईल.

तिखट कमी पण रंग हवा असेल तर तेलात थोडी कश्मिरी मिरची पावडर किंवा किसलेलं बीट घाला.

दूध कोमट असताना त्यात विरजण लावल्यास एक हिरवी मिरची देठासह त्यात घाला. त्यामुळे दही लवकर लागण्यास मदत होते.