Gokulashtami 2025 जन्माष्टमीला कृष्णजन्म सोहळा डेकोरेशनसाठी ७ सुंदर आयडिया, घर दिसेल मंदिरासारखं प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 14:40 IST2025-08-13T09:15:26+5:302025-08-13T14:40:59+5:30

जन्माष्टमी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी, त्यासाठीची सजावट अशी लगबग अनेक घरांमध्ये दिसून येत आहे.
जन्माष्टमीचा देखावा यंदा कसा करावा असा गोंधळ होत असेल तर या काही आयडिया पाहा..
अगदी झटपट तुम्ही अशी काही सजावट करू शकता. अशी छानशी सजावट असेल तर कोणत्याही उत्सवाचा आनंद निश्चितच वाढतो.
थर्माकोलचे मोर आणि इतर साहित्य विकत आणून तुम्ही झटपट असा देखावा करू शकता. तुमच्या शहरातल्या बाजारपेठांमध्ये किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही हे साहित्य मागवू शकता.
हा एक सुंदर देखावा पाहा. पीव्हीसी पाईप वापरून तुम्ही अशा पद्धतीचा देखावा करू शकता.
बासरी आणि मोरपीस एवढ्या दोनच गोष्टी वापरून बघा किती छान सजावट करता येते..
दही- दुधाने भरलेली बोळकी, श्रीकृष्णाचा पाळणा असा हा देखावा जन्माष्टमीसाठी अगदी परफेक्ट आहे.
केळीची पानं, विड्याची पानं, आंब्याची पानं वापरून अशी सुंदर सजावट करता येऊ शकते.
तुमच्याकडे मोरपीस भरपूर प्रमाणात असतील तर त्याचा असा सुरेख वापर करता येईल.