शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूड सेलिब्रिटींसारखी साडी नेसण्यासाठी ५ टिप्स, बघा स्टायलिश- आकर्षक दिसण्यासाठी कशी नेसायची साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2024 16:42 IST

1 / 7
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे महिलांची साडी, दागिने अशा वेगवेगळ्या प्रकारची खरेदी जोरात सुरू आहे.
2 / 7
लग्नसराईसाठी त्याच त्या टिपिकल पद्धतीने साडी नेसण्याचा कंटाळा आला असेल आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची असेल तर बॉलीवूड सेलिब्रिटींचे हे काही खास साडी लूक पाहा. अशी साडी नेसाल तर नक्कीच चारचौघींमध्ये उठून दिसाल.
3 / 7
आलिया भटचा हा एक लेटेस्ट लूक पाहा. यामध्ये तिने दोन साड्यांचा वापर केला आहे. एक साडी नेहमीप्रमाणे नेसली आणि दुसरी एखाद्या शालीप्रमाणे घेऊन खांद्यावरून खाली सोडली. असा लूक करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या साडीऐवजी एखाद्या हेवी ओढणीचा किंवा मग शेल्याचा वापर करू शकता.
4 / 7
साडी विथ जॅकेट हा ट्रेण्डही सध्या खूप जाेरात सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा लूक करायला हरकत नाही. कारण तसंही सध्या थंडीचेच दिवस आहेत. साडीवर जॅकेट असेल तर थंडीपासूनही संरक्षण होईल.
5 / 7
घागरा स्टाईल नेसलेली साडीही खूप छान लूक देते. लग्नासारख्या पारंपरिक कार्यक्रमांना अशी साडी घातली तर नक्कीच सगळ्यांमध्ये उठून दिसाल. पण यासाठी चमकदार रंगाची आणि मोठे काठ असणारी साडी निवडा.
6 / 7
लग्नसराईमध्ये सगळे जमले की अनेक घरातल्या महिला डोक्यावरून पदर घेतात. पदराऐवजी आलियासारखा असा लूक करू शकता. तिने साडीला मॅच होणारी ओढणी डोक्यावरून घेतली आहे आणि नेहमीप्रमाणे फ्लोटिंग पदर घेतला आहे.
7 / 7
साडी विथ बेल्ट हा ट्रेण्डही सध्या गाजतो आहे.
टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सsaree drapingसाडी नेसणे