काखेत काळेपण-हाताचे कोपरे काळवंडले? १ चमचा मसूर डाळीचा ‘हा’ उपाय झटकन करतो टॅनिंग कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 16:24 IST2025-07-09T14:54:20+5:302025-07-09T16:24:08+5:30

काही जणींचे अंडरआर्म्स खूप काळवंडलेले असतात. त्यामुळे मग स्लिव्हलेस कपडे घालण्याचीही त्यांना लाज वाटते.(how to reduce blackness or tanning in underarms?)

याशिवाय हाताचे कोपरेही अतिशय काळे पडलेले असतात. तिथे डेडस्किन खूप जमा झाल्यामुळे कोपऱ्यांवर अक्षरश: काळे घट्टे पडतात.(home hacks to get rid of tanning on elbow)

हा त्रास कमी करायचा असेल तर मसूर डाळ अतिशय उपयोगी ठरते. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..

हा उपाय करण्यासाठी १ ते २ चमचे मसूर डाळ चांगली धुवून घ्या आणि पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजायला ठेवा.

त्यानंतर ती डाळ मिक्सरमधून वाटून घ्या. आता मसूर डाळीच्या पेस्टमध्ये थोडं बेसन घाला. यामुळे तिथली डेडस्किन निघून जाण्यास मदत होईल.

तसेच एक चमचा हळद आणि एका लिंबाचा रस घाला. लिंबामुळे त्वचेचा काळेपणा कमी होतो. आता हा लेप काखेत आणि हाताच्या कोपऱ्यावर लावा.

१५ ते २० मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. टॅनिंग, डेडस्किन जाऊन अंडरआर्म्स, हाताचे कोपरे स्वच्छ होतील.

तुम्ही मानेचा काळेपणा कमी करण्यासाठीही हा उपाय करू शकता. चेहरा चमकदार करण्यासाठीही हा लेप उपयुक्त ठरतो.