घरच्या इडल्या कडक होतात? ८ ट्रिक्स, मऊसूत-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या-पीठ दुप्पट फुलेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:38 IST2025-12-28T11:09:44+5:302025-12-28T11:38:33+5:30

How To Make Soft Idli At Home : पीठ ज्या भांड्यात आंबायला ठेवता त्याचे झाकण हवाबंद नसावे.

इडलीसाठी तांदूळ आणि उदीडाच्या डाळीचे प्रमाण नेहमी ३ वाट्या तांदळासाठी १ वाटी इतकं ठेवा. हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात डाळ-तांदूळ भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पिठातील सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि पीठ चांगलं हलकं होतं. (How To Make Soft Idli At Home)

तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. पण उडीदाची डाळ १ ते २ वेळाच धुवा. डाळीवरचे नैसर्गिक स्टार्लीश घटक जास्त धुतल्यामुळे निघून गेले तर इडलीला हवा तसा मऊपणा येत नाही. (How To Make Soft Idli)

पीठ ज्या भांड्यात आंबायला ठेवता त्याचे झाकण हवाबंद नसावे. पिठाला श्वास घेण्यासाठी थोडी जागा लागते तरच ते पीठ नीट फुगते. (Idli Making Tips)

पीठ वाटून झाल्यावर ते हातानं किमान २ ते ३ मिनिटं एकाच दिशेनं जोरात फेटा. हाताच्या उष्णतेमुळे पीठ आंबवण्याची प्रक्रिया जलद आणि चांगली होते.

जर पीठ नैसर्गिकररित्या नीट फुगलं असेल तर सोडा घालू नका. सोड्यामुळे इडली सुरूवातीला मऊ वाटते पण थंड झाल्यावर कडक होऊ शकते.

इडली पात्राला तेल लावण्यापूर्वी साच्यात थोडं पाणी शिंपडा आणि मग तेल लावा. यामुळे इडली काढताना सहज निघते आणि कडा कडक होत नाहीत.

इडली शिजल्यावर गॅस लगेच बंद करा पण इडली पात्र लगेच उघडू नका. 2 ते 3 मिनिटं वाफ आतच जिरू द्या. यामुळे इडलीचा ओलावा टिकून राहतो.

इडली काढताना चमचा आधी थंड पाण्यात बुडवून मगच इ़़डली काढा. जेणेकरून इडली तुटणार नाही आणि मऊ राहील.