गुलाबाचं रोप वाढलं उंच पण फुलंच येत नाहीत? ७ टिप्स-गुलाबांनी वाकून जाईल कुंडीतलं रोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:49 IST2025-11-10T21:56:38+5:302025-11-11T17:49:14+5:30
How To Make Rose Plant Bloom : रोपाच्या वाढीसाठी आणि फुलांच्या काळात फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असलेले संतुलित खत द्या.

गुलाबाच्या रोपाला दिवसातून कमीत कमी ६ ते ८ तास थेट सुर्यप्रकाश द्या. कमी प्रकाशात फुलं येत नाहीत किंवा लहान येतात. (How To Make Rose Plant Bloom)

मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी द्या. जास्त पाणी झाल्यास मुळं सडतात तर कमी पाणी झाल्यास कळ्या गळून पडतात.

हिवाळ्याच्या सुरूवातीला किंवा फुलं कमी झाल्यावर हलकी छाटणी करा. यामुळे नवीन फांद्या फुटतात आणि त्यावर फुलं येतात.

फुलून गेलेली किंवा सुकलेली फुलं त्यांच्या देठासह लगेच काढा. यामुळे रोपाची ऊर्जा नवीन कळ्या तयार करण्याकडे जाते.

रोपाच्या वाढीसाठी आणि फुलांच्या काळात फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असलेले संतुलित खत द्या.

वापरलेली चहा पावडर मातीत मिसळा यात नायट्रोजन आणि टॅनिक एसिड असते. ज्यामुळे मातीची आम्लता वाढते आणि फुलं चांगली येतात.

केळीच्या सालीचे तुकडे मातीत मिसळा किंवा त्याची पावडर करून घाला. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे फुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.

थंडीत रोपाची पाने जास्त वेळ ओली राहिल्यास बुरशीचा धोका वाढतो. त्यामुळे चांगली हवा खेळती राहू द्या.

















