टोमॅटो काळे पडतात- लवकर सडतात? ५ टिप्स- फ्रीजशिवाय टोमॅटो राहातील खूप दिवस फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 21:14 IST2025-11-25T18:52:47+5:302025-11-25T21:14:36+5:30

Tomato storage tips : Keep tomatoes fresh: How to store tomatoes : काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर टोमॅटो लवकर खराबही होणार नाही आणि दीर्घकाळ टिकतील.

टोमॅटो हा पदार्थाची चव वाढवण्याचे काम करतो. भाजी, आमटी, सूप, चटणी, सांभार ते सलादमध्ये टोमॅटोचा वापर करतात. पण टोमॅटो नसला की स्वयंपाक अपुरा वाटतो. या रोजच्या भाजीपाल्याला टिकवणं, फ्रेश ठेवणं मात्र प्रत्येक गृहिणीसाठी डोकेदुखी ठरते. (Tomato storage tips)

अनेकदा आपण स्वस्त मिळतात म्हणून भरपूर टोमॅटो खरेदी करतो. पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही ते काळे पडतात, खराब होतात, कुजतात. ज्यामुळे ते लवकर सडतात. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर टोमॅटो लवकर खराबही होणार नाही आणि दीर्घकाळ टिकतील. (Keep tomatoes fresh)

टोमॅटो जितके कोरडे आणि योग्य हवेच्या वातावरणात राहतील, तितके जास्त दिवस ताजे राहतात. खराब टोमॅटो बाजूला न काढल्यास चांगले टोमॅटोसुद्धा लवकर खराब होतात.

कच्चे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नका. ते कागदात किंवा कागदी पिशवीत गुंडाळून खोलीच्या तापमानावर ठेवा. यामुळे ते लवकर खराब होणार नाही.

पिकलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नका, कारण थंड हवा त्यांची चव आणि पोत खराब करते. म्हणून ते थंड, कोरड्या जागी साठवा.

टोमॅटो लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्याचे देठ कायम वरच्या बाजूला असायला हवे.

जर आपल्याला टोमॅटो जास्त काळ साठवायचे असतील तर ते धुवू नका. टोमॅटो धुतल्याने त्यांच्या बाहेरील थरांवर ओलावा अडकतो ज्यामुळे ते लवकर खराब होतात.