उन्हातून आल्यावर लघवी करताना खूप आग होते? ७ उपाय, जळजळ होणार नाही-ना खाज येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 23:11 IST2026-03-29T12:14:42+5:302026-03-29T23:11:58+5:30

How Can I Relieve The Burning Sensation While Urinating : रात्री एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि जीरं भिजत घाला. सकाळी ते पाणी गाळून प्या. धणे हे शीतल गुणधर्माचे असल्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

लघवी करताना होणारी जळजळ ही समस्या साधारणपणे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा संसर्गामुळे होते. ही जळजळ कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय करायला हवेत. (How Can I Relieve The Burning Sensation While Urinating)

दिवसभरातून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया बाहेर निघण्यास मदत होते. (7 Home Remedies For Burning Urine)

नारळ पाणी नैसर्गिकरित्या थंड असते. ते शरीरातील उष्णता कमी करते आणि लघवीतील जळजळ थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे.

रात्री एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि जीरं भिजत घाला. सकाळी ते पाणी गाळून प्या. धणे हे शीतल गुणधर्माचे असल्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात ते संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तसंच लिंबू पाण्यातील व्हिटामीन सी बॅक्टेरिया नष्ट करण्यास उपयुक्त ठरते.

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा शरीरातील उष्णता वाढली असताना काकडी खाल्ल्यानं शरीराला गारवा मिळतो.

प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता राखणं खूपच महत्वाचे आहे. सुती इनरवेअर्स वापरा. जेणेकरून हवा खेळती राहील आणि संसर्ग टाळता येईल.

लघवी जास्तवेळ रोखून धरू नका. लघवी जास्तवेळ रोखून धरल्यानं बॅक्टेरियांची वाढ होते. ज्यामुळे जळजळ आणि संसर्ग वाढू शकतो.