घरभर माश्या-लाइटभाेवती किडे घोंघावतात? ५ उपाय- घरातली झुरळं-पालीही होतील गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:44 IST2025-08-29T13:02:57+5:302025-08-29T14:44:15+5:30
Home Remedies To Get Rid Of Insects : पाण्यात तेजपत्ता, दालचिनी आणि बोरिक एसिड मिसळा. यामुळे झुरळं निघून जाण्यास मदत होईल.

घरात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे किडे प्रवेश करतात. काही किटक जमिनीवर रांगत असतात तर काही उडतात. या किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.
लाईट्सभोवती जमा होणारे डास, किटक, झुरळांना पळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करू शकता.(Home Remedies To Get Rid Of Insects)
व्हिनेगरचं सोल्यूशन टिश्यूनं फळांच्या टोपलीच्या आजूबाजूला लावा. ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या किड्यांना नियंत्रणात ठेवता येईल.
पाण्यात मीठ घालून कोळ्यांच्या जाळ्यांवर शिंपडू शकता. ज्यामुळे घरात कोळी जाळे तयार करणार नाहीत.
लाल मुग्यांना पळवण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. हळदीच्या साहाय्यानं लाल मुंग्या पळवण्यास मदत होते.
पाण्यात तेजपत्ता, दालचिनी आणि बोरिक एसिड मिसळा. यामुळे झुरळं निघून जाण्यास मदत होईल.
पाण्यात काळी मिरी मिसळून पालींवर स्प्रे केल्यानं पाली दूर राहतात. स्प्रे बॉटलमध्ये काळी मिरी पावडर घाला. जेव्हा तुम्हाला पाली दिसतील तेव्हा त्यावर शिंपडा ज्यामुळे पाली दूर होतील.
किचन स्लॅबच्या कोपऱ्यांवर लवंग ठेवल्यानं किटक प्रवेश करत नाहीत. खाण्यापिण्याच्या पदार्थांजवळ लवंग ठेवू शकता.