१ तोळ्यापेक्षाही कमी सोन्यात येणाऱ्या एकदाणी, बोरमाळेचे सुंदर प्रकार- कमी पैशांत घ्या देखणा दागिना..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 10:25 IST2025-12-01T10:20:40+5:302025-12-01T10:25:01+5:30

लग्नसराईनिमित्त एकदाणी किंवा बोरमाळसारख्या पारंपारिक दागिन्यांची खरेदी करायची असेल तर त्यात सध्या अनेक वेगवेगळे डिझाईन्स आले आहेत.

या माळांचे वैशिष्ट्य असे की त्या दिसायला खूप ठसठशीत दिसत असल्या तरी वजनाने मात्र अगदी कमी असतात.

हे मणी दिसायला भरीव वाटत असले तरी आतून पोकळ असतात किंवा काही मण्यांमध्ये लाख भरलेली असते.

त्यामुळे अगदी १ तोळ्यापेक्षाही कमी सोन्यामध्ये तुम्हाला असा सुंदर दागिना मिळू शकतो.

अशी तीनपदरी माळही खूप कमी सोन्यामध्ये तयार होते आणि शिवाय ती वजनानेही खूप हलकी असते.

हल्ली सोनं एवढं महाग झालेलं असताना सोन्याच्या दागिन्यांची हौस भागवायची असेल तर हे असे लाईटवेट दागिने हा एक उत्तम पर्याय आहे.

जर बोरमाळेला अशा नाजूक काळ्या मण्यांची जोड दिली तर मंगळसूत्र म्हणूनही ते घालता येतात.

लग्नकार्यात घालायला असा एखादा दागिना आपल्याकडे हवाच..

















