रोज ‘हे’ ७ पदार्थ खाता म्हणून होतो गॅसेसचा त्रास, हमखास चुकणारा आहार-पोटाला भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 13:03 IST2025-09-09T12:55:02+5:302025-09-09T13:03:39+5:30

Eating these 7 foods every day causes gas problems, see what to do and how to manage diet : रोज हे पदार्थ खाणे ठरते त्रासदायक. गॅसेसची समस्या असेल तर टाळा हे पदार्थ.

काही पदार्थ आपल्या रोजच्या आहाराचा भाग असतात. त्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदेही अनेक असतात. मात्र त्या पदार्थांमुळे गॅसेसचा त्रासही होतो. असे पदार्थ खाताना काळजी घ्यायला हवी.

जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत आणि ते खाताना सोबत लिंबाचा रस तूप तसेच हिंगाची फोडणी घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे जास्त गॅसेसचा त्रास होणार नाही.

पावटा, वाल यामध्ये पोषण असतेच. घरोघरी वालाची उसळ केली जाते. मात्र या लहान बिया प्रचंड वात वाढवतात. त्यामुळे पोटातही गॅसेसचे प्रमाण वाढते.

राजमा प्रथिने आणि फायबरने परिपूर्ण आहे. मात्र अति राजमा खाणे किंवा राजम्याची मसालेदार भाजी खाणे आरोग्यासाठी त्रासाचे ठरु शकते. गॅसेस चढून पोट दुखते.

सोयाबिन डाएटसाठीही एकदम मस्त पदार्थ आहे. त्यात खुप पोषण आहे मात्र सोयाबिन जास्त खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

उडदाची डाळ उपमा, डोसा आदी अनेक पदार्थांमध्ये आपण वापरतो. ही डाळ खाणे खाणे आरोग्यासाठी उपयुक्तच आहे मात्र अति उडदाची डाळ खाल्यास गॅसेस होतात.

डाळी खाणे म्हणजे फार महत्त्वाचे असते. मात्र डाळी पचायला जरा जड असतात. त्यामुळे डाळ खाल्यावर गॅसेस होऊ शकतात. डाळीत थोडे हिंग घालणे म्हणून फायद्याचे ठरते.

कोबी, फुलकोबी, आदी अशा भाज्या शरीरातील वायू वाढवतात. त्यामुळे कोबीच्या भाजीत आलं घातले जाते. त्यामुळे कोबी खाताना गॅस होत नाहीत.

चवळीची भाजी सगळे आवडीने खातात. मात्र चवळी पचायला जरा जड असते. तसेच त्यामुळे पोट फुगते आणि गॅसेसचे प्रमाण वाढते. त्यामुळे चवळी खाताना जरा बेतानेच खा.