गाडीवर मिळते तशी घट्ट ओल्या खोबऱ्याची घरीच करा; १० टिप्स, इडलीसोबत खा चमचमीत चटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:12 IST2025-11-22T12:55:50+5:302025-11-22T14:12:26+5:30

Coconut Chutney Recipe : या टिप्स वापरून तुम्ही रेस्टॉरंटसारखी चविष्ट नारळाची चटणी बनवू शकता.

इडलीसोबत (Idli) खाण्यासाठी नारळाची चटणी परफेक्ट होण्यासाठी खालील महत्वाच्या टिप्स तुम्ही वापरू शकता. (How To Make Coconut Chutney)

चटणीसाठी नेहमी ओल्या आणि ताज्या नारळाचा किस वापरा. यामुळे चव चांगली येते. (Idli Chutney South Style Chutney Recipe)

नारळ आणि भाजलेल्या चण्यांचे प्रमाण योग्य ठेवा. अर्धा भाग नारळ आणि पाव भाग डाळ वापरल्यास चटणीला चांगलं टेक्स्चर येतं.

आंबटपणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे दही किंवा चिंचेचा लहान तुकडा वापरा. लिंबू रस वापरत असाल तरतो सर्वात शेवटी मिसळा.

तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरा आणि ती नारळासोबत बारीक करा.

चटणी मिक्सरमध्ये बारीक करताना थोडं थोडं पाणी घालून बारीक करा. एकाचवेळी जास्त पाणी घालू नका. चटणीची जाडी व्यवस्थित ठेवा.

चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर मिसळा. साखर चवीचा समतोल राखते.

फोडणीसाठी गरम तेलात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिंग वापरा.

तयार फोडणी चटणीवर लगेच ओला आणि नीट ढवळून घ्या. यामुळे चटणीला उत्तम सुगंध आणि चव येते.

चटणीला एक विशिष्ट आणि छान चव देण्यासाठी नारळ बारीक करताना त्यात लसणाचे २ ते ३ तुकडे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. यामुळे चटणीला चव अधिक येते आणि चवदार लागते.