उन्हाळ्यात वजन कमी करा झरझर, खा 'ही' ६ फळं ! खा मस्त व्हा तंदुरुस्त पटकन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 12:07 IST2025-04-05T11:33:30+5:302025-04-05T12:07:07+5:30

Best Weight Loss Fruits For Summer : 6 summer fruits you should eat for weight loss : 6 Summer Fruits That Help To Beat the Heat & Losing Weight : Best Summer Fruits For Weight Loss, According To A Dietitian : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होते..

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात तुम्ही अगदी सहज वजन कमी (6 summer fruits you should eat for weight loss) करू शकता. उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या अनेक फळांमध्ये कॅलरीज (Best Summer Fruits For Weight Loss, According To A Dietitian) आणि साखरेचे प्रमाणही कमी असते आणि ते वजन कमी (Best Weight Loss Fruits For Summer) करण्यासाठी चांगले असते.

उन्हाळ्यात अशी अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन अगदी सहज कमी करू शकता.

कलिंगड हे उन्हाळ्यातील प्रत्येकाचे आवडते फळ आहे. हे पाण्याने समृद्ध फळ आहे. कलिंगडात ९२ % पाणी असते. कलिंगड खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला खूप कमी कॅलरीज मिळतात. कलिंगडात व्हिटॅमिन ए, बी6, सी, अमिनो अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खूप आवडतो. आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंबा फक्त खाण्यासाठीच रुचकर नसून अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी आढळते. आंब्यामध्ये भरपूर फायबर असते.

व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे वजन कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. संत्र्यामध्ये कॅलरी आणि साखर खूप कमी असते.

किवीमध्ये खूप कमी साखर असते आणि त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, हे हृदय आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात अननसही मुबलक प्रमाणात येते. अननसात अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अननस हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही.

उन्हाळ्यात गोड-गोड खरबूज खायला सर्वांनाच आवडते. खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. खरबूज खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. यामुळे त्वचा चमकदार होते तसेच वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते.