पावसाळ्यात सततच्या सर्दी- तापाने हैराण? इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ घरगुती पदार्थ, राहाल फिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 18:07 IST2025-08-19T18:01:28+5:302025-08-19T18:07:49+5:30
Monsoon immunity booster foods: Home remedies for cold and fever : सर्दी-खोकल्यापासून बरे होण्यासाठी हे ५ पदार्थ खा.

पावसाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे आपल्या सर्दी-खोकला किंवा ताप येतो. इतकंच नाही तर या काळात साथीचे रोग, पोटाचे विकार देखील वाढू लागतात. हवेतील ओलावा आणि तापमानातील बदलामुळे शरीराची रोगप्रतिकाशक्ती कमी होऊ लागते. (Monsoon immunity booster foods)
रोगप्रतिकाशक्ती कमी झाल्यावर अशक्तपणा जाणवतो. तोंडाची चव बिघडते अशावेळी आपल्या दैनंदिन आहारात काही स्वयंपाकघरातील मसाल्यांचा समावेश केल्यास आजारांपासून वाचण्यास मदत होईल. सर्दी-खोकल्यापासून बरे होण्यासाठी हे ५ पदार्थ खा. (Home remedies for cold and fever)
आल्यामध्ये जंतूनाशक आणि लसणामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म आहेत. पावसाळ्यामध्ये आले-लसूणचं सूप, चहा किंवा भाजीमध्ये वापर केल्यास शरीराला उब मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.
संत्री, मोसंबी, डाळिंब यांसारखी व्हिटॅमिन C युक्त फळं खाल्ल्याने शरीरात अँटिऑक्सिडंट्स वाढतात. ही फळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून संसर्गजन्य आजारांपासून बचाव करतात.
तुळशीची पानं ही पावसाळ्यातील सर्वात उत्तम औषध मानली जातात. तुळशीचा काढा किंवा चहा प्यायल्याने सर्दी कमी होते, तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने शरीराला उब मिळते, सर्दी-खोकला कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
पावसाळ्यातील वातावरणामुळे पचनशक्ती मंदावते. अशावेळी गरमागरम भाज्यांचं सूप किंवा मूग डाळीचं सूप हे हलकं, पचायला सोपं आणि पोषणदायी ठरतं.