‘ही’ औषधे घेत असाल तर चुकूनही पिऊ नका कॉफी, वाढेल शुगर आणि तब्येत अजून बिघडेल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 16:42 IST2025-04-25T16:36:56+5:302025-04-25T16:42:56+5:30
avoid coffee with these medicines: side effects of coffee with medication: औषधे घेताना किंवा इतर काही पदार्थांसोबत कॉफी प्यायल्याने इनफेक्शन वाढते.

हल्ली चहा-कॉफीचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. परंतु, सतत कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कमी प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. (avoid coffee with these medicines)
अनेकदा आपण कॉफीचे सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास आरोग्य बिघडते. औषधे घेताना किंवा इतर काही पदार्थांसोबत कॉफी प्यायल्याने इंफेक्शन वाढते. (side effects of coffee with medication)
सर्दी- खोकला झाल्यानंतर आपण औषधांसोबत कॉफी पितो. यामुळे मेंदूच्या पेशींना उत्तेजित होतात.ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात.
आपण डिप्रेशनची औषधे घेत असू तर त्या सोबत कॉफी पिऊ नका. कॅफिन आणि औषधांमुळे पचनावर परिणाम होतो. ज्यामुळे रक्तदाबाचा धोका अधिक वाढतो.
कॉफी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते. ज्यासाठी कॅफिन जबाबदार असते. मधुमेह असणाऱ्या लोकांना औषधांसोबत कॉफी पिऊ नये.
आपण अँटीबायोटिक्स घेत असू तर त्या सोबत कॉफी पिऊ नका. ही औषधे कॅफिन चयापचय रोखू शकतात. ज्यामुळे रक्तातील कॅफिन वाढून हदयाची गती वाढते.
रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत कॉफी पिऊ नका. यामुळे औषधांचा विपरीत परिणाम होऊन जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
थायरॉईड औषध, अल्झायमर औषध, ऑस्टियोपोरोसिस औषध, अँटीसायकोटिक, दमा, एडीएचडी सारख्या औषधांसोबत कॉफी पिऊ नका.