Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:32 IST2026-04-04T14:25:20+5:302026-04-04T14:32:19+5:30
Rupa Bayor : अरुणाचल प्रदेशची रूपा बायोर ही तायक्वांदो जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर झेप घेणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

अरुणाचल प्रदेशची रूपा बायोर ही तायक्वांदो जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर झेप घेणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

रूपाची ही प्रगती तिने गेल्या काही वर्षांत खेळाप्रती दाखवलेलं सातत्य आणि कठोर परिश्रम दर्शवते. यापूर्वी जागतिक क्रमवारीत ६ वं स्थान आणि आशियाई क्रमवारीत पहिलं स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली होती.

जागतिक क्रमवारीतील वाटचाल थक्क करणारी आहे. २०२१ मध्ये १२३ व्या स्थानावर असलेली रूपा, २०२२ मध्ये ४२ व्या, २०२३ मध्ये १२ व्या आणि आता २०२४ मध्ये थेट ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ती आशियातील टॉप रँक खेळाडू आहे.

रूपाने चौथ्या वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांदो पूमसे चॅम्पियनशिपमध्ये 'रिकॉग्नाइज्ड इंडिव्हिज्युअल पूमसे U30' श्रेणीत सुवर्णपदक पटकावलं.

यापूर्वी बंगळुरू येथील कोरामंगला स्टेडियमवर झालेल्या फायनल नॅशनल टीम ट्रायलमध्ये विजय मिळवून तिने भारतीय तायक्वांदो संघात आपलं स्थान निश्चित केलं होतं.

नुकत्याच दिल्लीतील हयात रीजन्सी येथे पार पडलेल्या 'इंडिया तायक्वांदो गाला अवॉर्ड्स २०२६' मध्ये रूपाला 'बेस्ट तायक्वांदो पूमसे प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी रूपा बायोरचं अभिनंदन केलं असून तिचं हे यश भारतीय तायक्वांदोसाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं म्हटलं आहे.

















