अनुष्का शर्मालाही पडली सिल्व्हर कानातल्यांची भूरळ! ५ लेटेस्ट पॅटर्न, कुर्ती-ड्रेससाठी सिंपल पण रॉयल स्टाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 17:35 IST2025-01-02T20:00:00+5:302026-01-02T17:35:02+5:30
Anushka Sharma fashion: silver earrings : silver jhumkas: latest earring designs : ऑफिस कुर्तीसाठी योग्य ठरणाऱ्या सिल्व्हर कानातल्यांचे ५ लेटेस्ट पॅटर्न.

सध्या बॉलिवूड अभिनेत्रींचा फोकस हा चित्रपटपुरता मर्यादित राहिलेला नाही. पार्टी किंवा कॅज्युअल लूकसाठी देखील त्या आपल्या अॅक्सेसरीजकडेही तितकंच लक्ष देतात. यामध्ये सिल्व्हर कानातले कायमच ट्रेंडमध्ये असतात. अनुष्का शर्माने घातलेल्या सिल्व्हर कानातले हलक्या, एलिगंट आणि प्रोफेशनल लूक देतात. (Anushka Sharma fashion)

ऑफिस कुर्ती, ड्रेसवर हे कानातले अगदी परफेक्ट दिसतात. जड दागिन्यांपेक्षा ही ज्वेलरी घालायला सोपी आणि कर्म्फटेबल असतात. चला तर मग जाणून घेऊया ऑफिस कुर्तीसाठी योग्य ठरणाऱ्या सिल्व्हर कानातल्यांचे ५ लेटेस्ट पॅटर्न.(silver earrings)

मिनिमल राउंड सिल्व्हर झुमका. हे फार मोठे नसतात आणि त्यावर जास्त नक्षीकामही केलेले नसते. साध्या कॉटन कुर्तीवर किंवा स्ट्रेट कुर्तीवर छान दिसतात. ज्यामुळे आपला लूक रॉयल दिसतो.

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कानातले. हलकी डिझाइन आणि मॅट फिनिश असलेल्या हे कानातले ऑफिस कुर्तीवर खूपच एलिगन्स लूक देतात. प्रिंटेड किंवा इंडिगो कुर्तीवर हे कानातले उठून दिसतात. ओव्हरड्रेसिंग न करता आपल्याला स्टायलिश लूक मिळेल.

हाफ-हूप सिल्व्हर कानातले. हे थोडे वक्र डिझाइनमध्ये असतात. हे कानातले ऑफिससाठी परफेक्ट मानले जाते. फार लांब नसल्यामुळे आपले लक्ष देखील विचलीत होत नाही.

जिओमेट्रिक डिझाइन सिल्व्हर कानातले हे चौकोन, त्रिकोण किंवा ओव्हल शेप पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात. प्लेन कुर्ती, पलाझो किंवा पॅंट्ससोबत हे कानातले घातल्यास लूक अधिक स्मार्ट आणि कॉन्फिडंट दिसतो.

स्लिम झुमका स्टाइल सिल्व्हर कानातले. पारंपरिक झुमक्यांपेक्षा हे कानातले हलके आणि लहान असतात. ऑफिसमध्ये एथनिक टच हवा असेल तर हा पर्याय उत्तम आहे.

















