रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा 'हे' २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 19:05 IST2025-07-11T19:00:00+5:302025-07-11T19:05:02+5:30

glow mask for face: Turti skincare benefits: Pimples cure at home: तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया.

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात.

त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया.

गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवा. सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

रात्रभर चेहऱ्यावर तुरटी लावल्याने आपल्या त्वचेवरील मुरुमे कमी होऊ शकतात. तसेच बॅक्टेरिया नष्ट होतील आणि त्वचा निरोगी होईल.

जर आपली त्वचा तेलकट असेल. त्वचेवर मुरुमे आणि इतर समस्या वारंवार होत असतील तर या समस्यांपासून आराम मिळेल.

रात्रभर त्वचेवर तुरटी लावल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होते. तुरटी लावल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.

चेहऱ्यावर तुरटी लावल्याने काळे डाग, ठिपके आणि मुरुमे कमी होतात. तसेच त्वचा उजळण्यास मदत होते.