बॅड कोलेस्टेरॉल वाढलंय हे सांगणारी ८ लक्षणं; हार्ट अटॅक टळेल, आयुष्य वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:31 IST2026-03-25T13:09:01+5:302026-03-25T13:31:13+5:30
8 Symptoms That Shows Your Cholesterol Is So High : कोलेस्टेरॉल वाढल्यास त्याचा परिणाम यकृतावर दिसून येतो. ज्यामुळे पित्त वाढणं, मळमळ होणं किंवा अचपनाचा त्रास होऊ शकतो.

शरीरात कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) वाढल्याची स्वत:ची अशी स्पष्ट सुरूवातीचा लक्षणं नसतात. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हटलं जातं. जेव्हा कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून अडथळा निर्माण होतो तेव्हा खालील ८ लक्षणं दिसून येतात. (8 Symptoms That Shows Your Cholesterol Is So High)

छातीत दुखतं.
कोलेस्टेरॉल खूपच जास्त वाढल्यास छातीत दुखतं आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे अस्वस्थता जाणवतो.

थकवा येणं
जेव्हा पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत तेव्हा व्यक्तीला सतत थकवा जाणवतो आणि साध्या कामातही उत्साह राहत नाही.

चालताना धाप लागणं
हृदयावर ताण आल्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे थोडं चालल्यावर किंवा पायऱ्या चढल्यावर लगेच धाप लागते.

हाता-पायांना मुंग्या येणं
हात आणि पायांच्या नसांमध्ये रक्तप्रवाह मंदावल्यामुळे मुंग्या येणं, पाय थंड पडणं किंवा अचानक बधीरपणा जाणवणं ही लक्षणं दिसतात.

डोळ्यांभोवती डाग येणं
वैद्यकिय भाषेत याला झँथिलास्मा असं म्हणतात. डोळ्यांच्या पापण्यांभोवती कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हे पिवळे डाग दिसतात.

चक्कर येणं
मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास डोकं जड होणं, एकाग्रता कमी होणं किंवा वारंवार चक्कर येण्याचे प्रकार घडू शकतात.

पित्त, मळमळ
कोलेस्टेरॉल वाढल्यास त्याचा परिणाम यकृतावर दिसून येतो. ज्यामुळे पित्त वाढणं, मळमळ होणं किंवा अचपनाचा त्रास होऊ शकतो.

मेयो क्लिनिक आणि नॅशनल हार्ट, लंग एण्ड ब्लड इन्स्टिट्यूटनुसार वाढलेलं कोलेस्टेरॉल तपासण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे लिपिड प्रोफाईल ही चाचणी करणं होय.

















