दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा त्रास, प्रदूषण वाढते? बाल्कनीत आजच लावा ८ रोपं - प्रदूषण टळेल, वातावरण हवेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 10:51 IST2025-10-14T09:24:20+5:302025-10-14T10:51:45+5:30

8 best air purifier plants at home for diwali pollution : Diwali pollution control plants : air purifier plants for Diwali :best plants to reduce air pollution at home : दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण कमी करणारी ही रोपं नक्की कोणती ते पाहा...

दिवाळी म्हटलं की रोषणाई, फटाके आणि उत्साहाचं वातावरण असतं. पण याच (Diwali pollution control plants) फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे घरातील वातावरण खराब होतं फटाक्यांचा धूर आणि प्रदूषणही वाढतं. हवेतील धूर, कार्बन आणि रासायनिक घटकांमुळे श्वसनाच्या तक्रारी, ऍलर्जी आणि डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सणाचा आनंद घेतानाच आपल्या घरातील वातावरण प्रदूषणमुक्त आणि ताजं ठेवणं गरजेचे असते. हवेतील विषारी घटक जसे की कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, आणि इतर हानिकारक वायू वाढतात.

यासाठी सर्वात नैसर्गिक आणि सोपा उपाय म्हणजे, घरात प्रदूषण कमी करणारी (8 best air purifier plants at home for diwali pollution) झाडं लावणं! ही झाडं हवेतील हानिकारक घटक शोषून घेतात आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात.अशावेळी, जर तुम्हाला घरातील हवा शुद्ध ठेवायची असेल, तर काही खास प्रदूषणमुक्त करणारी रोपं लावली पाहिजेत. ही रोपं नैसर्गिक एअर प्युरिफायर म्हणून काम करतात आणि तुम्हाला शुद्ध हवा मिळण्यास मदत करतात. प्रदूषणाचे प्रमाण कमी करणारी ही रोपं नक्की कोणती आहेत ते पाहूयात...

हे रोप फारशी देखभाल न घेता किंवा कमी काळजी घेऊनही चांगले वाढते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते दिवस-रात्र दोन्ही वेळी ऑक्सिजन बाहेर टाकते. हे रोप बेंझीन, फॉर्मल्डिहाइड, आणि ट्रायक्लोरोइथिलीनसारखे विषारी घटक शोषून घेते. रात्री फटाक्यांचा धूर जास्त असतो, तेव्हाही हे रोप तुम्हाला शुद्ध हवा पुरवते.

तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. हे रोप कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि ऑक्सिजन सोडते. तसेच, तुळशीमध्ये वातावरण जीवाणूमुक्त ठेवण्याचे गुणधर्म असतात. तुळस हवेतील विषारी घटक आणि धुराचा त्रास कमी करण्यास मदत करते.

अनेक घरांमध्ये मनी प्लांटचे रोप असतेच, ते कमी सूर्यप्रकाशातही चांगले वाढते. हे रोप हवेतील विषारी रसायने शोषून घेते आणि हवा शुद्ध ठेवते.

या रोपाला सुंदर पांढरी फुले येतात आणि ते कमी प्रकाशातही चांगले वाढते. हे रोप अमोनिया, बेंझीन, झायलीन आणि ट्रायक्लोरोइथिलीनसारखे विषारी घटक शोषून घेते. विशेषतः घरामध्ये पेंट किंवा फर्निचरमधून निघणारे विषारी घटक शोषण्यासाठी हे रोप उपयुक्त आहे.

मॉन्सटेराचे रोप दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. जर घरात हे रोप लावले, तर प्रदूषणाला कायमचे दूर ठेवू शकता. याचा युनिक आणि खास लूक असल्यामुळे आपण ते घराच्या सजावटीसाठी देखील वापरू शकता.

जर दिवाळीत घराची सुंदरता वाढवायची असेल, तर आपण घरात हे रोप लावू शकता. या रोपाला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते आणि हे एक उत्तम इनडोअर प्लांट म्हणून देखील ओळखले जाते तसेच ते वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

हे रोप हवा शुद्ध करण्यासोबतच आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे दिवाळीतील धुरामुळे होणारा कोरडेपणा कमी होतो. हे फॉर्मल्डिहाइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे विषारी घटक प्रभावीपणे शोषून घेते.

हे रोप कार्बन मोनोऑक्साइड आणि झायलिन यांसारख्या सामान्य घरगुती प्रदूषकांना शोषून घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या गार्डनमध्ये किमान एक तरी स्पायडर प्लांट हवेच.