मिक्सरच्या भांड्यांच्या ब्लेडची धार बोथट झाली आहे? मिक्सरजारमध्ये ७ वस्तू घालून मिनिटभर फिरवा - ब्लेड होईल नव्यासारखे धारदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2025 20:24 IST2025-11-07T17:27:06+5:302025-11-08T20:24:20+5:30
7 way to sharpen mixer grinder blades at home : how to sharpen mixer grinder blades at home : मिक्सरच्या बोथट झालेल्या ब्लेडला पुन्हा नव्यासारखी धार आणण्यासाठी खास टिप्स पाहूयात...

मिक्सर ग्राइंडर हे स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचे आणि उपयोगी उपकरण. चटणी तयार (7 way to sharpen mixer grinder blades at home) करण्यापासून ते वाटणकरण्यापर्यंत, मिक्सरमुळे आपले काम खूपच सोपे होते. पण, रोजच्या वापरामुळे मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार हळूहळू कमी होते. धार कमी झाल्यावर मसाले व्यवस्थित बारीक होत नाहीत, कूट जाडसर राहतो आणि बारीक वाटप होण्यासाठी मिक्सर जास्त वेळ लावावा लागतो.

मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार बोथट झाल्यावर, बऱ्याच गृहिणी नवीन ब्लेड विकत घेतात, पण प्रत्यक्षात मिक्सरचे जुने ब्लेड फक्त काही सोप्या घरगुती उपायांनी पुन्हा धारदार करता येऊ शकते, तेही फक्त ५ मिनिटांत... तुमच्या मिक्सरच्या बोथट झालेल्या ब्लेडला पुन्हा नव्यासारखी धार आणण्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स पाहूयात...

१. मीठ :-
मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला धार आणण्यासाठी मीठ हा सर्वात सोपा आणि उपयुक्त घरगुती उपाय आहे. मिठाचे छोटे खडे ब्लेडवर घासले गेल्याने ब्लेडला पुन्हा नव्यासारखी धार परत येते. मिक्सरच्या भांड्यात १ कप जाडे मीठ घेऊन, मिक्सर हाय स्पीडवर सुमारे ३० सेकंदांसाठ फिरवा. मीठ बारीक पावडरसारखे झालेले दिसेल. आता मिक्सर बंद करा. मीठ काढून टाकून भांडं पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

२. बर्फाचे खडे :-
ब्लेडला धार आणण्यासाठी त्याचबरोबर ब्लेडचे तापमान कमी करण्यासाठी बर्फाचे खडे खूप उपयोगी ठरतात. ब्लेड गरम झाल्यामुळे त्याची धार कमी होते, बर्फामुळे ती उष्णता कमी होते आणि धार परत येते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात ५ ते ६ बर्फाचे खडे घालून, मिक्सर फिरवून घ्या. या उपायामुळे मिक्सरची धार पुन्हा येईल.

३. भाजलेले तांदूळ/शेंगदाणे :-
भाजलेले तांदूळ किंवा शेंगदाणे देखील ब्लेडला धारदार करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी कच्चे/भाजलेले तांदूळ किंवा कच्चे शेंगदाणे घाला, मिक्सर हाय स्पीडवर सुमारे १ मिनिट फिरवा या उपायामुळे मिक्सरच्या ब्लेडला पुन्हा नव्याने धार येते.

४. लिंबू आणि बेकिंग सोडा :-
मिक्सरच्या जारमध्ये थोडं कोमट पाणी घाला. त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण १ ते २ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवा. यामुळे ब्लेडवरील तेलकट थर, गंज आणि जमा झालेली घाण निघते, त्यामुळे धार पुन्हा नव्याने तीक्ष्ण होते.

५. कच्ची मसूर डाळ :-
कच्ची मसूर डाळ मिक्सरमध्ये २ मिनिटे फिरवा. या डाळीच्या कठीण कणांमुळे ब्लेडला नैसर्गिक पद्धतीने धार काढता येते.

६. व्हिनेगर आणि मीठ :-
मिक्सर जारमध्ये पाणी घ्या, त्यात २ चमचे व्हिनेगर आणि १ चमचा मीठ घाला. हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा आणि ५ मिनिटांनी धुवा. ब्लेडवरील गंज, बुरशी आणि तेलकट थर पूर्णपणे नाहीसा होतो, ज्यामुळे ब्लेड पुन्हा चमकदार आणि धारदार होते.

७. रिकामी औषधांच्या गोळयांची पाकीट :-
रिकामी औषधांच्या गोळयांची पाकीट कापून त्याचे लहान तुकडे करावेत. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर फिरवून घ्यावा. या उपायामुळे मिक्सरच्या पात्याला पुन्हा नव्याने धार येते. याचप्रमाणे, आपण अॅल्युमिनियम फॉईलचा देखील अशाच प्रकारे वापर करु शकतो. अॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे करून त्यांचे गोळे तयार करा आणि ते मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर फिरवा.

















