७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 20:06 IST2025-02-11T19:58:39+5:302025-02-11T20:06:30+5:30

7 seeds, 7 herbs - easy to grow no efforts or expenses : घराच्या गॅलेरीत, खिडकीत लावू शकता अशी रोपं. जाणून घ्या कोणती आहे.

या रोपांची जपणूक करण्यासाठी कष्टही कमी लागतात. पदार्थ स्वत:हून उगवून वापरण्याचा आनंद काही औरच आहे.

ही घ्या रोपांची यादी. गॅलरी मस्त भरून जाईल.

आजकाल रोजमेरीचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. तिची किंमत आकाशाला टेकायला फार वेळ लागणार नाही. पण घरी रोजमेरीचे रोप लावणे फार सोपे आहे. विकत आणलेल्या चांगल्या कोंबा पासून गॅलेरीतच रोप लावा.

आपण रोजच कडीपत्ता वापरतो. भाजीवाल्याशी वाद घालून फुकटात कडीपत्ता घेतो. त्यापेक्षा घरीच रोप लावा. कडीपत्ता एकदा का फुलला की, त्याचा तो पसरत जातो.

हिरवी मिरचीचे रोप घरात वाढवणे अगदीच सोपे आहे. बियांपासूनही घरीच रोप तयार करता येते किंवा विकतही आणू शकता.

तुळस तर प्रत्येकाच्या दारात असावीच. अत्यंत औषधी असते. तसेच प्रसन्न असते. बियांपासून रोप नेहमीच्या पद्धतीनेच तयार करता येते.

गोकर्णाची फुले प्रचंड औषधी असतात. वजन कमी करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. गोकर्णाचे रोप कोणत्याही नर्सरीत आरामात मिळेल . ते आणून वाढवा. फार काही काळजी घ्यावी लागत नाही.

कोरफड केसांपासून त्वचेपर्यंत सगळ्यावरतीच गुणकारी आहे. अगदी लहानशा जागेतही ती व्यवस्थित वाढते. वेळोवेळी वाळलेली कोरफड वेगळी करा. बाकी पाणीही कमी लागते आणि काळजीही.

चहामध्ये घालायलाच नाही तर, केसांसाठी सुद्धा गवती चहा चांगला असतो. घरी त्याचे रोप वाढवणे अत्यंत सोपे आहे. रोजच्या चहासाठी घरचाच गवती चहा वापरा.

सर्व रोपांना योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि कटिंग करा. खतांचा वापर करा. माती बदलत राहा. मग बघा रोपं कशी छान वाढतील.