दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारे ६ पदार्थ! हिवाळ्यात ठणकणाऱ्या हाडांना मिळेल मजबुती - राहा तंदुरुस्त...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2025 17:09 IST2025-12-04T16:40:43+5:302025-12-04T17:09:32+5:30
6 foods with more calcium than milk : 6 foods with more calcium than milk : foods higher in calcium than milk : कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधापेक्षा बेस्ट आहेत ५ शाकाहारी पदार्थ...

आपल्यापैकी बहुतांश जणांना असे वाटते की, हाडे मजबूत ठेवण्यासाठी (5 foods with more calcium than milk ) आणि शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम मिळवण्यासाठी फक्त दूध पिणे हाच एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे. हे काही प्रमाणात खरे असले तरी, काहीजणांना दूध पिणेच आवडत नाही. दूध म्हणजे कॅल्शियमचा उत्तम स्रोत हे आपल्याला माहितच आहे, पण हाडे मजबूत ठेवण्यासाठी फक्त दूध पुरेसं ठरत नाही. अशा परिस्थितीत शरीराला आवश्यक असलेलं कॅल्शियम इतरही अनेक नैसर्गिक पदार्थांमधून सहज मिळू शकतं.

आपल्याकडे काही असे पदार्थ आहेत की जे, दुधापेक्षाही जास्त किंवा त्याच्या (5 foods with more calcium than milk) बरोबरीचे कॅल्शियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्वे पुरवतात. हे पदार्थ फक्त तुमच्या रोजच्या कॅल्शियमची गरज पूर्ण करत नाहीत, तर ते तुमच्या हाडांना ताकद आणि मजबुती देतात.

जर तुम्हाला सांधेदुखी किंवा हाडांच्या कमजोरपणाची समस्या टाळायची असेल, तर तुमच्या आहारात या ५ पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दूधाव्यतिरिक्त कोणते ५ पदार्थ आहेत, जे तुमच्या हाडांना मजबूत ठेवून तुम्हाला भरपूर कॅल्शियम देतात, ते पाहूयात...

१. हिरव्या पालेभाज्या :-
पालक, मेथी, चवळी यांसारख्या भाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन - के भरपूर प्रमाणात असते. हे घटक हाडांच्या मजबूतसाठी फायदेशीर ठरते. आठवड्यातून ३ ते ४ वेळा पालेभाज्या खा.

२. बदाम आणि अक्रोड :-
सुक्या मेव्यामध्ये बदाम आणि अक्रोड हाडांसाठी खूप फायदेशीर असते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. हे घटक हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवून देतात आणि त्यांची मजबूती वाढवतात.

३. तीळ :-
तिळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक जास्त असते. विशेषतः हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू किंवा तिळाची चटणी खाल्ल्यास हाडांना मजबूती मिळते.

४. सोयाबीन आणि टोफू :-
टोफू, सोया मिल्क आणि सोयाबीन हे प्लांट बेस्ड कॅल्शियम आणि प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. हे खास करून शाकाहारी असणाऱ्यांच्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

५. मोड आलेली कडधान्ये :-
मोड आलेले मूग, हरभरा आणि गहू यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक हाडांची पुनर्रचना करण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी मदत करतात.

६. पनीर आणि दही :-
दही आणि पनीर हे दूधापेक्षा पचायला सोपे असते आणि त्यातही भरपूर कॅल्शियम असते जे हाडांना मजबुती देते.

















