गुलाबी गाल-चेहऱ्यावर चमक आणि परफेक्ट फिगर! आलिया भटच्या सौंंदर्यांचं सिक्रेट- फक्त ५ गोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 18:53 IST2025-05-17T16:33:21+5:302025-05-17T18:53:54+5:30

आलिया भटचे नो मेकअप लूक अनेकदा व्हायरल झालेले आहेत. त्या सगळ्या फोटोंमधून असं दिसून येतं की ती मेकअप करून तिचं सौंदर्य निश्चितपणे अधिक खुलवत असली तरी तिची त्वचा मुळातच छान आहे.(5 top secrets behind alia bhatt's glowing skin and perfect figure)
शिवाय राहाची आई झाल्यानंतरही तिच्या फिगरमध्ये काहीही फरक पडलेला नाही. ती अजूनही तेवढी फिट आणि परफेक्ट फिगर असणारी आहे.(5 top secrets behind alia bhatt's glowing skin and perfect figure)
हे सगळं तिला जमतं याचं कारण म्हणजे तिने व्यायाम आणि आहार यासोबतच काही सवयी स्वत:ला लावून घेतल्या आहेत. त्यामुळेच तर आलियाचे सौंदर्य दिवसागणिक वाढते आहे. अशा कोणत्या सवयी तिला आहेत आणि आयुर्वेदाचे कोणते नियम पाळून ती स्वत:ला फिट ठेवते ते पाहुया..(alia bhatt's skin care routine)
आलिया भटला सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात बसायला खूप आवडते. यामुळेच तिला व्हिटॅमिन डी मिळते. त्याचा परिणाम तिच्या सौंदर्यावर आणि आरोग्यावरही दिसून येतो.
फळांचा रस पिण्यापेक्षा फळं खाण्याकडे तिचा अधिक भर आहे. यामुळे फळांमधल्या फायबरचा आणि इतर पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभ तुमच्या शरीराला मिळतो.
आलिया भट सुद्धा बॉलीवूडमधल्या अशा काही सेलिब्रिटींच्या यादीमध्ये आहे जे लोक रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ च्या आधी घेतात. त्यानंतर ते काहीही खाणं टाळतात. यामुळे वजन आणि इतर शारिरीक व्याधी नियंत्रित राहण्यास खूप मदत होते.
गाजर, काकडी, बीट, रताळी दही असे पदार्थ खाण्यावर तिचा जास्त भर असतो.
योगा, जीम, पुशअप्स, रनिंग, वॉकिंग असे वेगवेगळे वर्कआऊट करून ती स्वत:ला फिट ठेवते.