जेवण झाल्या-झाल्या तुम्हीही ‘या’ ५ गोष्टी करताय? ९० टक्के लोक त्यामुळेच पडतात सतत आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 15:09 IST2025-08-29T09:07:30+5:302025-08-29T15:09:31+5:30

तब्येत उत्तम ठेवायची असेल तर जेवण करताना तसेच जेवण केल्यानंतर काही नियम पाळले पाहिजेत. पण बऱ्याच लोकांची घाईगडबडीत नेमकी याच बाबतीत चूक होते आणि मग तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी छळू लागतात.
त्या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूया.. त्यापैकी पहिली चूक म्हणजे जेवण झाल्यानंतर खूप पाणी पिणे. यामुळेे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. अपचन, ॲसिडीटी, गॅसेस असा त्रास सुरू होतो.
जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणे, आडवे पडणे किंवा मग बसून राहणे हे देखील तब्येतीसाठी चांगले नाही. यामुळे वजन वाढते. तसेच पचनाच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढायला लागतात.
जेवण झाल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घेऊ नये. बऱ्याच लाेकांना नाश्त्यानंतर लगेच चहा घेण्याची सवय असते. पण ती अतिशय चुकीची आहे. कारण चहा- कॉफीमध्ये असणारे टॅनिन आणि कॅफिन अन्नपदार्थांमधले पौष्टिक पदार्थ रक्तात शोषून घेण्यास अडथळा आणतात. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाऊनही त्यांचा लाभ शरीराला होत नाही.
जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाऊ नये. फळांच्या पचनासाठी लागणारा वेळ आणि जेवणातले अन्नपदार्थ पचण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो. हे दोन्ही पदार्थ एका मागे एक खाल्ल्यास अपचन होते. जेवणानंतर साधारण दिड ते दोन तासांनी फळं खावे.
जेवण झाल्यानंतर लगेचच हेवी व्यायाम करणेही टाळायला हवे.