गव्हाच्या पिठाचे ५ पौष्टिक पदार्थ, १० मिनिटांत करा आणि खा झटपट-उन्हाळी सुट्टी स्पेशल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 18:24 IST2026-03-20T18:15:24+5:302026-03-20T18:24:59+5:30
5 nutritious wheat flour dishes, make in 10 minutes - quick summer holiday special : गव्हाच्या पिठाचे चविष्ट पदार्थ.

कणकेच्या फक्त पोळ्याच करता का? गव्हाच्या पिठाचे विविध पदार्थ करता येतात, अगदी सोप्या रेसिपी आहेत. त्यामुळे नक्कीच करुन पाहा. शिवाय कमी वेळात आणि कमी सामग्रीत होतात.

कणकेची खीर हा एक गोड आणि पौष्टिक पदार्थ आहे. तुपावर परतलेली कणीक, त्यात गूळ किंवा साखर आणि दूध घालून केलेली ही खीर शरीराला ऊर्जा देते आणि थकवा दूर करण्यास मदत करते. हलकी असूनही चवदार असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ती आवडते.

कणकेची पेज हा अतिशय हलका आणि पचायला सोपा पदार्थ आहे. विशेषतः आजारी व्यक्ती, लहान मुलं किंवा ज्यांना पोटाच्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी ही पेज फायदेशीर ठरते. कमी मसाल्यात आणि मऊसर असल्यामुळे शरीराला आराम मिळतो.

लापशी (कणकेची गोड लापशी) हा पारंपरिक गोड पदार्थ असून सणासुदीला किंवा खास प्रसंगी केला जातो. तूप, गूळ आणि वेलचीच्या सुगंधामुळे त्याला एक वेगळीच चव येते, तसेच हा पदार्थ शरीराला ताकद देणारा मानला जातो.

कणकेचा शीरा हा रव्याऐवजी कणीक वापरुन केलेला एक वेगळा गोड पदार्थ आहे. तूप आणि साखर- गूळ यामुळे त्याची चव अधिक खुलते आणि हा शीरा पौष्टिक तसेच पोटभरीचा ठरतो.

कणकेचे लाडू हे ऊर्जा देणारे आणि साठवून ठेवता येणारे गोड पदार्थ आहेत. तूप आणि गूळ- साखर वापरून केलेले हे लाडू विशेषतः प्रवासात किंवा पटकन काही खायचं असेल तेव्हा उपयोगी पडतात.

















