बॉडी डिटॉक्स करणारे ५ पदार्थ, शरीरातली घाण बाहेर फेकली जाऊन राहाल निरोगी, चेहऱ्यावर येईल तेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 12:20 IST2026-04-04T12:11:52+5:302026-04-04T12:20:56+5:30

शरीर नॅचरली डिटॉक्स करायचं असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत..

सध्या उन्हाळा असल्याने या दिवसांत बाजारात टरबूज भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे या दिवसांत टरबूज खा आणि किडन्या नॅचरली डिटॉक्स करा. कारण टरबुजामध्ये पाणी चांगल्या प्रमाणात असल्याने किडन्या स्वच्छ राहण्यास मदत होते.(5 foods that naturally detox your body)

लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी उसाच्या रसामध्ये असणारे काही घटक उपयुक्त ठरतात. त्यामुळे या दिवसांत उसाचा रसही प्या. पण ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा वजन कमी करण्यासाठी जे प्रयत्न करतात, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उसाचा रस प्यावा.(food that helps for body detox)

सकाळच्या ताज्या हवेत रनिंग, सायकलिंग, जाॅगिंग, वॉकिंग असे व्यायाम करा. कारण ही फ्रेश हवा फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते.

दही किंवा ताक हे प्रोबायोटिक असतात. ते नियमितपणे खाणे पचनक्रियेसाठी खूप चांगले असते.

बीट नियमितपणे खाल्ल्यास रक्तशुद्धी होण्यास मदत होते.

कोमट पाणी आणि लिंबू हे मिश्रण रोज सकाळी घेतल्यास बॉडी डिटॉक्स होते. यामुळे त्वचेवरही छान ग्लो येतो.

आणि यासोबतच रोज पाणीही योग्य प्रमाणात प्या. कारण पाण्यामुळेही शरीरातले कित्येक घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होते आणि बॉडी डिटॉक्स होते. ही माहिती डॉक्टरांनी dr_rupali_lavate_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

















