शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुपर कम्प्युटरच काय AI पेक्षाही सुपरफास्ट चालेल मुलांचं डोकं, रोज सकाळी खाऊ घाला ‘हे’ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 14:39 IST

1 / 6
अनेक घरांमध्ये मुलं सकाळी झोपेतून उठली की त्यांना दूध आणि बिस्किटे खायला दिली जातात. टोस्ट दिले जातात. पण यापेक्षा जर तुम्ही इतर काही पदार्थ मुलांना सकाळी उठल्यानंतर खायला दिले तर त्यामुळे मुलांचा नक्कीच बौद्धिक आणि शारिरीक विकास होऊ शकतो. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..
2 / 6
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मुलांना कोमट पाणी प्यायला द्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. शरीर हायड्रेटेड राहते आणि काेमट पाण्यामुळे लवकर ॲक्टीव्हेट होते.
3 / 6
सकाळी तुम्ही मुलांना साजूक तूप आणि खजूर एकत्र करून खायला द्या. यामुळे त्यांना भरपूर एनर्जी मिळते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. अशक्तपणाही कमी होतो.
4 / 6
गूळ, तूप आणि पोळी एकत्र करून मुलांना त्याचा चुर्मा करून द्या. यामुळे भरपूर ग्लुकोज मिळते. मेंदू ॲक्टीव्ह राहण्यास मदत होते. हा पदार्थ मुलांना डब्यात देण्यासाठीही खूप चांगला आहे.
5 / 6
वेगवेगळी हंगामी फळंही तुम्ही मुलांना देऊ शकता. फळांमधून व्हिटॅमिन्स, खनिजे आणि ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात मिळतात.
6 / 6
दोन भिजवलेले बदाम, एखादा काजू आणि एखादा अक्रोडही मुलांना सकाळी आवर्जून खायला द्या. यामुळे मेंदूलाही तरतरी येते. शिवाय त्यांच्यामधून हेल्दी फॅट्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्सही मिळतात.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वfoodअन्नkidsलहान मुलंHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स