शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वस्त मिळाली कोथिंबीर की लगेच करा कोथिंबीरीचे ५ चविष्ट पदार्थ, विस्मरणात गेलेल्या सुंदर रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 18:30 IST

1 / 7
कोणताही छान पदार्थ केला की शेवटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यावर घालतो. कोथिंबीरीमुळे पदार्थाला चव छान येते. कोथिंबीर पदार्थ छान दिसावा म्हणून त्यावर घालतात हे जरी खरं असलं तरी कोथिंबीरीची आहारातील भूमिका तेवढीच नाही.
2 / 7
कोथिंबीर फार पौष्टिक असते. आहारात असायलाच हवी. कोथिंबीर साईड पदार्थ म्हणून वापरली जाते. मात्र फक्त तेवढाच उपयोग नसून कोथिंबीरीचे खास पदार्थही करता येतात. पाहा कोणते पदार्थ आहेत.
3 / 7
कोथिंबीरीचे सूप हा एक हॉटेलात फार विकला जाणारा पदार्थ आहे. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. भरपूर कोथिंबीर आणि भरपूर लसूण घाला. एकदम मस्त आणि पौष्टिक सूप आहे.
4 / 7
कोथिंबीर वडी सगळ्यांच्या माहितीचीच आहे. महाराष्ट्रात केली जाणारी ही वडी चवीला एकदम मस्त असते. छान खमंग होते. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही वडी घरोघरी केली जाते.
5 / 7
कोथिंबीर विविध भाज्यांत घातली जाते. मात्र फक्त कोथिंबीरीचीही भाजी करतात, माहिती आहे का? पीठ पेरुनही केली जाते आणि फक्त लसणाची फोडणी देऊन केली तरी छान लागते.
6 / 7
कोथिंबीरीचे मुटकुळे हा पदार्थ एकदम पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. जसे मेथीचे केले जातात अगदी त्याच पद्धतीने कोथिंबीरीचेही करता येतात.
7 / 7
कोथिंबीरीची हिरवी चटणी तर घरी अनेकदा केली जाते. त्यात फक्त कोथिंबीर घालून काम भागत नाही. मात्र कोथिंबीर नसेल तर त्या चटणीला छान अशी चव येत नाही.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Healthy Diet Planआहार योजनाkitchen tipsकिचन टिप्सRecipeपाककृती