कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 09:22 IST2025-06-28T08:57:03+5:302025-06-28T09:22:45+5:30
4 Easy Tips To Prevent Kadhi From Splitting : Cooking Tips: 4 Reasons Why Your Kadhi Is Not Smooth : How to avoid lumps while preparing Kadhi : कढी तयार करताना बेत फसतो, हवी तशी परफेक्ट कढी करण्यासाठी खास टिप्स...

ताकाची कढी म्हटलं की, दाटसर, झक्कास चव, आणि सुरेख टेक्श्चर महत्वाचचं... पण कढी करताना अनेकदा ती फुटते, बेसनाच्या गुठळ्या होतात किंवा चव पांचट लागते आणि सगळा बेतच फसतो(4 Easy Tips To Prevent Kadhi From Splitting).
खरंतर, कढी करताना आपण नकळतपणे काही चुका करतो, या चुकांमुळेच कढी हवी तशी मनासारखी होत नाही. यासाठीच, अशा चुका टाळल्या तर कढी हमखास फक्कड होते. कढी करताना कोणत्या चुका (How to avoid lumps while preparing Kadhi) टाळाव्यात ते पाहा...
चूक १ :- बेसन नीट मिसळा, गुठळ्या राहू देऊ नका :-
कढी करताना बेसन थेट ताकात घालून कालवल्याने गुठळ्या तयार होतात. यासाठी आधी थोड्या पाण्यात बेसन घालून ते मिसळा, मग हळूहळू ताक घालून फेटा. बेसन अगदी स्मूद झालं पाहिजे. बेसन नीट मिसळा, गुठळ्या राहू देऊ नका. गुठळ्या राहिल्याचं तर हाताने त्या फोडा.
चूक २ :- तापलेल्या कढईत थेट ताक - बेसनाचं मिश्रण ओतणे :-
जोरात तापलेल्या कढईत ताक - बेसनाचं मिश्रण घातल्यास कढी फुटते. त्यामुळे आधी गॅस मंद करा, तुपात मसाला परतून झाल्यावर ताक-बेसनाचं मिश्रण हळूहळू ओता आणि सतत ढवळत राहा.
चूक ३ :- कढी उकळताना ढवळणं थांबवणे :-
कढीला उकळी येत असताना ती नीट ढवळत राहणं महत्त्वाचं असतं. ढवळणं सोडलं तर बेसन खाली बसून गुठळ्या होतात किंवा कढी फाटण्याची शक्यता असते.
चूक ४ :- कढी करताना मंद आचेवरच ठेवणं :-
बऱ्याचजणी कढी करताना सुरूवातीला मंद आचेवर करतात, त्यामुळे बेसन खाली बसतं आणि नंतर आच वाढवली की ते शिजून गुठळ्या तयार होतात. त्यामुळे कढी करताना सुरूवातीला मध्यम ते हाय फ्लेमवर करुन कढी सतत ढवळत शिजवायला हवी. एकदा उकळी आली की आच मंद करा आणि कढी हळूहळू शिजू द्या. मंद आचेवर दीर्घकाळ शिजवल्यानं कढीची चव आणखी छान लागते.
कढीला उकळी आल्यावर आपण वरून देखील फोडणी घालू शकता. या फोडणीत साजूक तूप, हिंग, जिरे, लाल मिरची आणि मेथी दाणे घालू शकता. यामुळे कढीची चव दुप्पट होते. बेसनाचा वास कमी करण्यासाठी त्यात किसलेलं आलं किंवा थोडी साखर देखील घालू शकता. जर चुकून कढीत गुठळ्या पडल्या असतील, तर हँड ब्लेंडर वापरून कढी स्मूद करता येते.