कुंडीतली माती होईल कसदार, पाहा कुंडीत १ चमचा हळद घालण्याचे ४ फायदे! खतांपेक्षा सोपा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2025 18:17 IST2025-12-06T17:26:27+5:302025-12-06T18:17:03+5:30

आपल्या रोजच्या जेवणात आपण नियमितपणे हळद घालतो. हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असल्याने ती आरोग्यदायीही असते. तब्येतीसाठी हळद जशी आरोग्यदायी असते, तशीच ती रोपांसाठीही खूप गुणकारी ठरते.

रोज १ चमचा हळद नियमितपणे रोपांना घातल्यास रोपांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येतो.

हळदीमध्ये गुणकारी घटक असल्याने जमिनीचा कस वाढण्यास मदत होते. त्यामुळे १५ दिवसांतून एकदा रोपांच्या कुंडीमध्ये एखादा चमचा हळद घालावी.

महिन्यातून एकदा कुंडीमधल्या मातीमध्ये हळद मिसळल्यास रोप चांगलं रुजायला मदत होते आणि त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते.

बऱ्याचदा रोपांवर रोग पडतो. अशावेळी रोपांवर हळद मिसळलेलं पाणी शिंपडल्यास रोग निघून जाण्यास मदत होते. हळदीसोबतच त्यात थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालावा.

















