'अशा' व्यक्तीशी चुकूनही लग्न करू नका; ८ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आयुष्य उद्धवस्त होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:59 IST2026-03-19T13:38:40+5:302026-03-20T11:59:35+5:30
10 Type Of Man You Should Not Marry Or Date (Biggest Red Flags In a Guy) : फक्त स्वत:च्या गरजा आणि सुखाचा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत जोडीदारी म्हणून सुखी राहणं अशक्य असते.

लग्न हा आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा निर्णय असतो चुकीच्या जोडीदाराची निवड भविष्यात मानसिक आणि भावनिक त्रास देऊ शकते. (10 Type Of Man You Should Not Marry Or Date)

व्यसनाधीन असलेली व्यक्ती
ज्या व्यक्तीला अमली पदार्थ, दारू किंवा जुगार यांसारखी गंभीर व्यसनं आहेत अशा व्यक्तीसोबत संसार करणं कठीण होतं. (Biggest Red Flags In a Guy)

हात उचलणारी व्यक्ती
छोट्या गोष्टींवरून हिंसक होणारी किंवा हात उचलणारी व्यक्ती तुमच्या मानसिक सुरक्षेसाठी घातक ठरू शकते.

पादरर्शकता आणि विश्वास
ज्या नात्यात पारदर्शकता आणि विश्वास नाही. जे नातं फार काळ टिकू शकत नाही.

अपमान करणारी व्यक्ती
जर एखादी व्यक्ती आपल्या पालकांचा, कनिष्ठांचा किंवा इतरांचा अपमान करत असेल तर भविष्यात ती तुमचाही अपमान करू शकते.

संशय घेणारी व्यक्ती
विनाकारण संशय घेणाऱ्या व्यक्तीमुळे वैयक्तीक स्वातंत्र्य संपते आणि मानसिक छळ सुरू होतो.

जबाबदारी न घेणारी व्यक्ती
जो माणूस चुकांची आणि संसाराची जबाबदारी घेण्यास तयार नसते त्याच्यावर भविष्यात विसंबून राहता येत नाही.

फक्त स्वत:चा विचार करणारी
फक्त स्वत:च्या गरजा आणि सुखाचा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत जोडीदारी म्हणून सुखी राहणं अशक्य असते.

भूतकाळात जगणारी व्यक्ती
जी व्यक्ती अजूनही जुन्या नात्यातून बाहेर पडलेली नाही ती तुम्हाला पूर्णपणे स्वीकारू शकत नाही.

















