नकळत शरीराचं नुकसान करतात 'या' १० सवयी; शरीर आतून पोकळ होण्याआधीच घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:55 IST2026-03-31T20:20:13+5:302026-03-31T20:55:38+5:30

10 Habits That Harm Your Health : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीचे आजार आणि पचनाच्या समस्या उद्भवतात.

आपल्या नकळत जडलेल्या काही सवयी भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. (10 Habits That Harm Your Health)

दिवसाला ७ ते ८ तास झोप न मिळाल्यास मानसिक तणाव वाढतो आणि इम्युनिटी कमी होते. (10 Things That Can Affect Your Health)

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीचे आजार आणि पचनाच्या समस्या उद्भवतात.

व्यायामाचा अभाव आणि तासनतास बसून राहिल्यानं हृदयविकाराचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

नाश्ता न केल्यानं शरीरातील उर्जेची पातळी खालावते आणि चयापचन क्रियेवर वाईट परिणाम होतो.

अति प्रमाणात साखर आणि मीठ खाण्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार होतात.

सतत प्रक्रिया केलेले अन्न, सतत बाहेरचे तेलकट किंवा पॅकेज्ड फूड खाल्ल्यानं यकृताचे नुकसान होते.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.

मद्यपान, धूम्रपान या सवयींमुळे फुफ्फुसं आणि यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो.

सतत मानसिक तणावाखाली असणं,जास्त विचार करणं किंवा कायम तणावाखाली राहिल्यानं हृदयाचे आरोग्य बिघडते.

चुकीच्या पद्धतीनं बसल्यामुळे किंवा वाकून बसण्यामुळे पाठीचे आणि मणक्यांचे कायमस्वरूपीचे आजार होऊ शकतात.