किचनमधले 'हे' १२ पदार्थ चुकूनही प्लास्टीकच्या डब्यात ठेवू नका; अन्यथा कॅन्सर होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:10 IST2026-03-25T15:43:49+5:302026-03-25T16:10:30+5:30

10 Foods You Should Never Store In Plastic Container : दूध, दही किंवा ताक प्लास्टीकमध्ये लवकर खराब होतात आणि त्यांचे पोषण मुल्य कमी होते.

प्लास्टीकचे डबे स्वयंपाकघरात सोयीचे वाटत असले तरी काही ठराविक पदार्थ ठेवणं आरोग्यासाठी आणि डब्याच्या टिकाऊपणासाठी धोक्याचं ठरू शकतं. १० पदार्थ प्लास्टीकच्या डब्यात ठेवणं टाळावं. (10 Foods You Should Never Store In Plastic Container)

गरम अन्नामुळे प्लास्टीकमधील बायस्फेनॉल ए सारखी घातक रसायनं अन्नात मिसळतात. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

दूध, दही किंवा ताक प्लास्टीकमध्ये लवकर खराब होतात आणि त्यांचे पोषण मुल्य कमी होते.

लिंबू आणि संत्र्यासारख्या पदार्थांमधील एसिड प्लास्टिकवर प्रक्रिया करते. ज्यामुळे डबा खराब होतो आणि चवही बदलते.

लोणच्यामध्ये व्हिनेगर आणि आम्ल असते. जे प्लास्टिकसोबत रासायनिक अभिक्रिया करू शकते.

कडक चहा प्लास्टीकच्या कपात किंवा डब्यात घेतल्यास प्लास्टीक वितरळण्याची आणि रसायनं पोटात जाण्याची भिती असते.

तेलाचे तापमान जास्त असल्यामुळे ते प्लास्टीकचा थर खराब करतात.

लाल तिखट किंवा हळदीच्या ग्रेव्हीमुळे प्लास्टीकवर कायमचे डाग पडतातआणि सुक्ष्म कण अन्नात उतरतात.

ड्रेसिंग घातलेले सॅलेड प्लास्टीकमध्ये ठेवल्यास ते लवकर मऊ होतात आणि त्याची ताजीतवानी चव राहते.

मधात नैसर्गिक आम्ल असते. जेव्हा मध प्लास्टिकच्या डब्यात साठवले जाते ते्हा त्यातील घटकांची प्लास्टीकसोबत रासायनिक अभिक्रिया होऊ शकते. यामुळे मधाची शुद्ध कमी होते आणि त्याची चवही बदलू शकते. मध नेहमी काचेच्या बाटलीत ठेवणं सर्वात सुरक्षित असते.

लसूण आणि आल्याचा उग्र वास प्लास्टिकचे डबे शोषून घेतात. हा वास इतका तीव्र असतो की डबा कितीही घासून धुतला तरी तो जात नाही. तसंच प्लास्टीकमुळे या पेस्टचा नैसर्गिक रंग लवकर बदलतो आणि ती खराब होण्याची शक्यता असते.