जर तुम्ही आजपासून व्यायाम करायला सुरूवात केली तर पाहा ३० दिवसांत शरीरात काय काय बदल होतील..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:59 IST2026-04-08T12:19:47+5:302026-04-08T16:59:28+5:30

10 Benefits Of Regular Physical Activity : व्यायामाच्या निमित्तानं सकाळी लवकर उठणं आणि वेळेचं नियोजन करणं यामुळे आयुष्यात एक प्रकारची शिस्त येते.

आजपासून व्यायाम सुरू करणं हा तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्तम निर्णयांपैकी एक ठरू शकतो. व्यायाम केल्यानं शरीरात काय बदल होतात समजून घेऊ. (What Happens When You Start Exercising)

नियमित व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजंतवानं आणि उत्साही वाटते. (10 Benefits Of Regular Physical Activity)

व्यायामामुळे शरीरातील एंडोर्फिनसारखी आनंदी संप्रेरके तयार होतात. ज्यामुळे ताण-तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.

दररोज घाम गाळल्यानं शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि तुम्ही वारंवार आजारही पडत नाही.

व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यामुुळे वजन आटोक्यात राहतं आणि शरीर सुडोल होण्यासही मदत होते.

धावणं, चालणं किंवा सायलकिंग यांसारखे व्यायाम केल्यानं हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

ज्या दिवशी तुम्ही शरीरीरिक कष्ट करता. त्या दिवशी शांत आणि गाढ झोप लागते. ज्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते.

वाढत्या वयानुसार होणारी हाडांची झीज थांबवण्यासाठी आणि स्नायूंचा कडकपणा कमी करण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा तुमचे शरीर निरोगी आणि फिट दिसू लागते तेव्हा तुमचा स्वत:बद्दलचा आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो.

व्यायामाच्या निमित्तानं सकाळी लवकर उठणं आणि वेळेचं नियोजन करणं यामुळे आयुष्यात एक प्रकारची शिस्त येते.

संधोधनानुसार जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांचे आयुष्य व्यायामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त सुखकर आणि दीर्घ असते.