रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे, प्रयत्न तर करा-जमेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 19:48 IST2025-02-21T19:31:40+5:302025-02-21T19:48:16+5:30

10 benefits of meditating for just 10 minutes every day, try it : रोज ध्यान केल्याने मिळतील अनेक फायदे.

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे.

दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते.

हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे.

भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी मदत होते. तसेच डोक्यातील नकोते विचार नाहीसे होतात.

भविष्याची चिंता आणि भूतकाळाबद्दल अति विचार करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा मदत करते. तसेच वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

मुख्य म्हणजे झोपेचे चक्र सुधारण्यासाठी ध्यान केल्याने मदत होते. वाईट स्वप्नेही पडत नाहीत.

मुड जर चांगला नसेल तर मुडही चांगला होतो. स्वत:बद्दल असलेला न्यूनगंड कमी होतो.

कामामधील कार्यक्षमता वाढते. कामात लक्ष लावणं सोपं जातं.

मानसिक स्वास्थ्य चांगले असले की, शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहते. त्यामुळे ध्यान केल्यावर व्यायाम वगैरे करण्यातही वेग येतो.

जर एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तर, निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत होते. विचारांमध्ये पारदर्शकता येते.