काय आहे किन्नर आखाडा, कधी झाली होती स्थापना, जाणून घ्या इतिहास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:17 IST2025-01-31T16:12:36+5:302025-01-31T16:17:17+5:30

अभिनेत्री ममता कुलकर्णीमुळे किन्नर आखाडा चर्चेत आला. पण, हा आखाडा कधी स्थापन झाला, कोणी स्थापन केला?

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर उपाधी घेतली.

ममता कुलकर्णी ममता नंद गिरी असे नाव देण्यात आले. पण, ममता कुलकर्णीने ज्या आखाड्याची दीक्षा घेतली, त्याची सुरूवात कधी झाली.

किन्नर आखाड्याची स्थापना १३ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली होती. उज्जैनमध्ये स्थापना झाल्यानंतर २०१६ मध्ये उज्जैनमध्ये आयोजित कुंभमेळ्यात हा आखाडा सहभागी झाला होता.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हा आखाडा सामील झाला.

किन्नर आखाड्याचा धर्म ध्वज पांढर्‍या रंगाचा आहे. जुन्या आखाड्यासोबत झालेल्या करारानुसार किन्नर आखाड्याचा धर्म ध्वज जुन्या आखाड्यासोबतच फडकावला जातो.