मुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 16:13 IST2019-10-23T16:01:19+5:302019-10-23T16:13:50+5:30

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. पालकही मुलांना शांत राहण्यासाठी फोन वापरण्याची परवानगी देतात. इंटरनेटवर असंख्य गोष्टी उपलब्ध असतात. मात्र त्यापैकी मुलांना कोणत्या गोष्टी पाहण्याचा सल्ला द्यायचा हे जाणून घ्या. मुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा.
वेळ ठरवून द्या
लहान मुलांसाठी एक खास वेळापत्रक तयार करा. यामध्ये त्यांचा खेळण्याचा, अभ्यासाचा, फोन वापरण्याचा वेळ निश्चित करा. जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यास मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम होतो.
मुलांसोबत मैत्री करा
लहान मुलं खूप जास्त मस्ती करतात, ऐकत नाहीत. त्यावेळी मुलांना समजून घ्या. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. त्याचा उत्तम मित्र व्हा म्हणजे सर्व गोष्टी मुलं न घाबरता तुमच्यासोबत शेअर करतील.
शैक्षणिक अॅप वापरण्याचा सल्ला द्या
सध्या अनेक शैक्षणिक अॅप उपलब्ध आहेत. त्यातून मुलांना असंख्य गोष्टी शिकायला मिळतात. स्मार्टफोनचा वापर खेळण्यासाठी करण्यासोबतच मुलं अभ्यास देखील यामुळे करू शकतात.
जास्त वेळ ऑनलाईन गेम्स खेळू देऊ नका
लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळायला प्रचंड आवडतं. यासाठीच त्यांना सतत पालकांचा फोन हवा असतो. मात्र मुलांना जास्त वेळ ऑनलाईन गेम्स खेळू देऊ नका कारण याचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. यापेक्षा त्यांना मैदानी खेळ शिकवा.
मुलांचे आदर्श व्हा
अनेकदा पालक जास्त वेळ फोनमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे मुलं देखील त्यांचंच अनुकरण करतात. त्यामुळे घरी असताना डिजिटल मीडियापासून थोडं दूर राहा आणि मुलांना वेळ द्या. तसेच मुलांसाठी आदर्श व्हा.