तुमची मुलं जास्त चिडचिड करतायत?, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 02:04 PM2020-02-17T14:04:03+5:302020-02-17T14:08:16+5:30

एखादी गोष्टी मनासारखी झाली नाही तर मुलं खूप चिडचिड करतात. त्यांचं वागणं आणि बोलणं बदलतं. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जाणून घेऊया.

लहान मुलांची काळजी घेताना पालकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. मुलं अनेकदा हट्टी असल्याने पालकांना त्यांना समजून सांगणं थोडं अवघड जातं.

एखादी गोष्टी मनासारखी झाली नाही तर मुलं खूप चिडचिड करतात. त्यांचं वागणं आणि बोलणं बदलतं. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जाणून घेऊया.

लहान मुलं अनेकदा खेळताना भांडण करतात. त्यावेळी त्यांना मारू नका तर प्रेमाने समजून सांगा. त्यांच्या चिडण्यामागचं नेमकं कारण समजून घ्या.

मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. अनेकदा भूक लागल्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यामुळे त्याचा आहार पोषक असावा.

मुलं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतील तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची आवड निर्माण करा. मुलांना क्रिएटिव्ह कामामध्ये व्यस्त ठेवा.

मुलांनी एखादी चूक केली तर आई-वडील लगेच रागवतात. मात्र दुसऱ्यांसमोर मुलांना ओरडू नका. यामुळे ते दुखावले जाऊ शकतात.

सर्व पालक आपल्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत असतात. योगा आणि व्यायामामुळे मुलांचं आरोग्य उत्तम राहतं. ती शांत राहतात. त्यामुळे या गोष्टी शिकवा.