अभ्यासापासून दूर पळणाऱ्या मुलांना 'या' ट्रिक्सच्या मदतीने करा मोटिव्हेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:40 PM2019-11-06T15:40:43+5:302019-11-06T16:08:36+5:30

लहान मुलांना खेळायला आवडतं. त्यामुळेच त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो. अभ्यास करायला आवडत नसल्याने मुलं त्यापासून दूर पळतात. मुलांना मोटिव्हेट कसं करायचं हे जाणून घेऊया.

मुलांना कोणता विषय आवडतो आणि कोणता आवडत नाही हे सर्वप्रथम जाणून घ्या. जो विषय आवडत नाही तो का आवडत नाही यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना मार्गदर्शन करा.

अभ्यासासाठी सतत मुलांच्या मागे लागू नका. तसेच सतत अभ्यासासाठी बसवू नका. अभ्यास करताना त्यांना मध्ये थोडा वेळ द्या. तसेच अभ्यासाशिवाय इतरही पुस्तकं वाचायला द्या.

मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो. त्यांना सोप्या भाषेत विविध गोष्टी शिकवा म्हणजे त्यांना अभ्यासाची गोडी लागेल.

अनेकदा मुलांना अभ्यास करताना खूप शंका असतात. प्रश्न पडतात. त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देऊन त्यांच्या शंकांचं निरसन करा.

मुलांना शिकवताना चित्रांचा वापर करा. मुलांना स्मार्टफोनवर अभ्यासाविषयीच्या गोष्टी सर्च करायला शिकवा.

मुलांच्या खेळण्याचं, अभ्यासाचं एक वेळापत्रक करा. त्यानुसार त्यांना वेळ द्या. तसेच मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा.