शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आठ नियम पाळा अन् ऑफिसमधलं राजकारण टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 2:52 PM

1 / 8
चांगले वागा- सहकाऱ्यांशी चांगले वागा. त्यांना आदर द्या. तुम्ही नम्रपणे वागा. त्यामुळे इतरही तुमच्याशी नम्रतेनं वागतील.
2 / 8
मुद्द्याला विरोध करा, व्यक्तीला नको- कार्यालयात अनेक सहकाऱ्यांसोबत काम करावं लागतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्यानं वाद होतात. अशावेळी व्यक्तीला विरोध नका, तर मुद्द्याला विरोध करा. कोणालाही लक्ष्य करू नका. त्या व्यक्तीच्या न पटणाऱ्या विषयांवरच बोला.
3 / 8
शांत राहा- एखादा वाद किती मोठा आणि महत्त्वाचा आहे, हा प्रश्न स्वत:ला नक्की विचारा. एखाद्या वादाचा परिणाम किती काळ राहील याचा विचार करा.
4 / 8
क्षमा करा अन् विसरा- तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास ती लगेच स्वीकारा. संवाद सुरू ठेवा आणि वाद टाळा. संवाद तुटल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. चूक झाल्यास क्षमा करा आणि ती चूक विसरून जा.
5 / 8
निष्पक्ष राहा- सर्वांना समान वागणूक द्या. कोणाच्याही बाबतीत पक्षपातीपणा करू नका.
6 / 8
गॉसिप्सपासून लांब राहा- गॉसिप्सपासून चार हात दूर राहा. ऑफिसमध्ये अनेकदा अफेअरची चर्चा होते. त्यात सामील होणं टाळा. इतरांनादेखील अशा चर्चा न करण्याचा सल्ला द्या. तुमचं कोणीही ऐकत नसेल, तर तिथून निघून जा आणि स्वत:च्या कामावर लक्ष द्या.
7 / 8
माणसांची निवड- कर्मचारी निवडायचे अधिकार असल्यास अतिशय काळजीपूर्वक माणसं निवडा. ऑफिसमधल्या राजकारणाबद्दलची त्यांची मतं जाणून घ्या. विविध परिस्थितीत कसं वागाल, हे त्यांच्याकडून जाणून घ्या.
8 / 8
फार लक्ष देऊ नका- कार्यालयातल्या राजकारणाकडे फार लक्ष देऊ नका. त्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होतो. राजकारणाकडे लक्ष दिल्यास तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल. त्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करुन कामाच्या दर्जात सुधारणा करा.