कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती, पण मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका; व्यापारी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:04 PM2022-05-21T19:04:01+5:302022-05-21T19:14:27+5:30

कोकण म्हटले की, साऱ्यांना हापूस आंबा आठवतोच. कोकणात आल्यावर हापूस आंब्याला विशेष मागणी असते. पण त्याही बरोबर कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. मात्र, गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने आता व्यापारी हवालदिल झाले आहेत.

कोकण म्हटले की, साऱ्यांना हापूस आंबा आठवतोच. कोकणात आल्यावर हापूस आंब्याला विशेष मागणी असते. सध्या बाजारात हापूस आंबा १५० ते ३५० रुपये डझन आहे.

पण त्याही बरोबर कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. रत्नागिरी शहरात रस्त्याच्या दुतर्फा कोकणी मेव्याची विक्री केली जात आहे.

सध्या बाजारात जांभूळ ४०० किलो आणि करवंद ५० रुपये पाव किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

काजूगर १२०० रुपये किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आता पावसाने हजेरी लावल्याने या कोकणी मेव्याच्या दरातही घट होण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात फणस ३०० रुपये, कापेगर ४० रुपये पुडी दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.